India Qualified for Semi final 2022: नेदरलँडसचा 13 धावांनी दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटमधून बाहेर

South Africa vs Netherlands T20 WC : नेदरलँडच्या क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटमधून बाहेर पडल्याने भारताला त्याचा फायदा झाल आहे.

netherlands team
नेदरलँडसचा 13 धावांनी दणदणीत विजय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नेदरलँडच्या क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी दणदणीत पराभव केला आहे.
  • त्यामुळे दक्षिण आफ्रिका या टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे.
  • दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटमधून बाहेर पडल्याने भारताला त्याचा फायदा झाल आहे.

South Africa vs Netherlands T20 WC : नेदरलँडच्या क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका टूर्नामेंटमधून बाहेर पडल्याने भारताला त्याचा फायदा झाल आहे. भारताला  6 गुण मिळाल्याने भारतीय क्रिकेट टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. असे असले तरी भारताचा सामना आता झिमाब्वे टीमशी होणार आहे. आजच भारत वि. झिमाब्वे असा सामना पहायला मिळणार आहे. (Netherlands cricket team won match against south Africa by 18 runs india qualify in semi final match)

अधिक वाचा : T20 World Cup 2022: वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला हा पहिला संघ

नेदरलँडने आधी फलंदाजी करून 20 ओवरमध्ये 158 धावा काढल्या आणि चार गडी बाद झाले होते. जेव्हा दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची वेळ आली तेव्हा 20 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचे 8 गडी बाद झाले आणि 145 धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा खेळ आटोपला. स्टीफन आणि मॅक्सने नेदरलँडसाठी उत्तम कामगिरी केली. दोघांनी मिळून 58 धावा काढल्या. त्यानंतर स्टीफन 37 धावा काढून बाद झाला. नेदरलँडच्या फलंदाजांनी यावेळी चांगली कामगिरी केली. मॅक्सने 20 चेंडूत 31 धावा काढल्या तर टॉम कूपरने 19 बॉल्समध्ये 35 धावा काढल्या. एकरमॅनने 26 चेंडूत 41 धावा काढून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून नॉर्खियाने दोन तर  बळी घेतले.  

अधिक वाचा : Sehar Shinwari: पाक अभिनेत्री झिम्बाब्वेच्या खेळाडूसोबत करणार लग्न, पण मोबदल्यात तिला हवी 'ही' गोष्ट


दक्षिण आफ्रिकेपुढे 159 धावा काढण्याचे आव्हान होते. परंतु हे आव्हान पेलवण्यात आफ्रिकेची टीम सुरूवातीपासून कमी पडली. फलंदाज क्विंटन डीकॉकने 13 चेंडूत 13 धावा काढल्या आणि बाद झाला. तेम्बा बावुमाने 20 बॉल्समध्ये 20 धावा काढून नांगी टाकली. कर्णधारानेही या सामन्यात चांगली कामगिरी बजावली नाही. रिली रोसोने 19 बॉल्समध्ये 25 धावा काढल्या. तर ऍडन मारक्रमने 17 धावा ढलया. वाले मिलरने 17 बॉलमध्ये 17 धावा काढल्या. तर क्लासेनने 18 बॉलमध्ये 21 धावा काढल्या. दक्षिण आफ्रिकेचे एका मागोमाग एक विकेट पडत गेले आणि त्यांचा पराभव झाला. 

अधिक वाचा :  T20 World Cup: विराट कोहलीच्या शत्रूंना रोहितने दिले सडेतोड उत्तर

दक्षिण आफ्रिकेच्या टीमने ग्रुप 2 मध्ये 5 सामन्यांत 2 सामने जिंकले होते. दक्षिण आफ्रिकेला पाच गुण मिळाले. भारतीय टीमने 4 सामन्यात 6 गुण मिळवले होते आणि भारताचा क्रमांक एक आहे. नेदरलँडसोबत झालेल्या सामनात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला आणि ही टीम टूर्नामेंटच्या बाहेर गेली. 

अधिक वाचा : IND vs BAN: मोहम्मद शमीच्या ऐवजी अर्शदीपला का दिली शेवटची ओव्हर? रोहित शर्माचे हे उत्तर

सेमीफायनलमध्ये पोहोचणारी भारतीय टीम ही तिसरी टीम आहे. टी 20 वर्ल्ड कप 2022 सुपर 12 मध्ये ग्रुप 2 भारताने अंतिम 4 मध्ये आपली जागा मिळवली आहे. तर दुसर्‍या सेमीफायनलिस्टचा निर्णय बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या सामन्यातून होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपचा पहिल्या दोन सेमीफायनलिस्ट टीमचा निर्णय ग्रुप 1 ने होणार आहे. इंग्लंड आणि न्युझीलँड टीमने  अंतिम 4 मध्ये प्रवेश केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी