लंकेविरुद्धच्या वन डे आणि टी २० साठी टीम इंडियाची घोषणा

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान जुलै २०२१ मध्ये वन डे आणि टी २० मॅचच्या सीरिज होणार आहेत. यासाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली.

India’s squad for ODI & T20I series against Sri Lanka announced
लंकेविरुद्धच्या वन डे आणि टी २० साठी टीम इंडियाची घोषणा 

थोडं पण कामाचं

  • लंकेविरुद्धच्या वन डे आणि टी २० साठी टीम इंडियाची घोषणा
  • भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ वन डे आणि ३ टी २० होणार
  • श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन भारताचा कर्णधार

मुंबईः भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान जुलै २०२१ मध्ये वन डे आणि टी २० मॅचच्या सीरिज होणार आहेत. यासाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताची टेस्ट टीम इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेट खेळत असेल, त्याच सुमारास श्रीलंकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे आणि टी २० सीरिज रंगणार आहे. यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वात वन डे आणि टी २० करिता स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. India’s squad for ODI & T20I series against Sri Lanka announced

जे खेळाडू भारताच्या टेस्ट टीममध्ये नाहीत असेच खेळाडू धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेत खेळणार आहेत. हा प्रयोग भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत पहिल्यांदाच करत आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रित बुमराह असे खेळाडू नसले तरी शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध खेळणारी टीम इंडिया मजबूत दिसत आहे. 

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, आर. गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक ​​पांड्या, नीतीश राणा, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया

नेट बॉलर्स (फक्त निवडलेल्या टीमला सराव देण्यासाठी) - ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर, सिमरजीत सिंह

१३ जुलै २०२१ - पहिली वन डे - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
१६ जुलै २०२१ - दुसरी वन डे - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
१८ जुलै २०२१ - तिसरी वन डे - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
२१ जुलै २०२१ - पहिली टी २० - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
२३ जुलै २०२१ - दुसरी टी २० - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो
२५ जुलै २०२१ - तिसरी टी २० - भारत विरुद्ध श्रीलंका - कोलंबो

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी