India’s squad for Paytm T20I series against South Africa and Test squad for the fifth rescheduled Test against England announced : मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नऊ जूनपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. या व्यतिरिक्त भारत आणि इंग्लंड यांच्यातील राहिलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठीही भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली. यातील पाचवा कसोटी सामना विशेष परिस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आला. हा कसोटी सामना आता होणार आहे. या मालिकेत चार कसोटींनंतर भारत २-१ असा आघाडीवर आहे. पाचवी कसोटी १ ते ५ जुलै २०२२ या कालावधीत एजबेस्टन बर्मिंगहॅम येथे खेळविली जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वरकुमार, हार्दीक पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 9 जून | दिल्ली |
दुसरा टी-20 सामना | 12 जून | कटक |
तिसरा टी-20 सामना | 14 जून | विशाखापट्टणम |
चौथा टी-20 सामना | 17 जून | राजकोट |
पाचवा टी-20 सामना | 19 जून | बंगळुरू |