Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा, रोहितला कर्णधारपद तर तीन नवोदितांना संधी

येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याच्या टी २० संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे तर उपकर्णधार पद हे केएल राहुलकडे देण्यात आले आहे. 

India’s T20 squad against NZ Rohit Sharma named India's T20 Capt
भारतीय संघाची घोषणा, रोहितला कर्णधारपद तर तीन नवोदित संघात 
थोडं पण कामाचं
  • येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याच्या टी २० संघाची घोषणा करण्यात आली आहे.
  • भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे तर उपकर्णधार पद हे केएल राहुलकडे देण्यात आले आहे. 
  • या सिरीजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, यांना विश्रांती देण्यात आली आहे.

मुंबई :  येत्या १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्याच्या टी २० संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे तर उपकर्णधार पद हे केएल राहुलकडे देण्यात आले आहे. 

या सिरीजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती, राहुल चहर यांना डच्चू देण्यात आला आहे. 

या संघात व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि  हर्षल पटेल  यांना संधी देण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यर, आवेश खान आणि हर्षल पटेल हे भारतीय संघात पहिल्यांदा स्थान मिळाले आहे. 

या संघात रवि बिश्नोईला संधी मिळू शकते असे वाटत होते, पण त्याला अजून वाट पाहावी लागणार आहे. 

युजुवेंद्र चहल, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांचे संघात पुनरागमन झाले आहे. 

NZ विरुद्ध भारताचा T20 संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हीसी), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर पंत (डब्ल्यूसी), इशान किशन (डब्ल्यूसी), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार. दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज

रोहित शर्माची भारताच्या T20 कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी