IND vs WI : भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 309 धावांचे लक्ष्य, धवन-गिल आणि अय्यरचे अर्धशतक

IND vs WI 1st ODI Live:भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क मैदानावर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर 309 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

India set a target of 309 runs against West Indies, half-centuries from Dhawan-Gill and Iyer
भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 309 धावांचे लक्ष्य, धवन-गिल आणि अय्यरचे अर्धशतक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वेस्ट इंडिजला विजयासाठी 309 धावा करायच्या आहेत.
  • कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 97 धावा केल्या.
  • धवन, गिल आणि श्रेयसचे अर्धशतक

IND vs WI : इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजमध्ये आहे. तिकडे त्रिनिदादमध्ये तीन वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या.

भारताकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 97 धावा केल्या. शुभमन गिलने 64 आणि श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.

मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि दीपक हुडा अपयशी ठरले. दीपक हुडा 32 चेंडूत 27, सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 13 आणि संजू सॅमसनने 18 चेंडूत 12 धावा केल्या. टीम इंडियाने 35 षटकात 225 धावा केल्या. येथून धावसंख्या 350 च्या जवळ जाईल असे वाटत होते, परंतु मधल्या फळीतील अपयशामुळे शेवटच्या 15 षटकात केवळ 83 धावा झाल्या. शार्दुल ठाकूर सात आणि मोहम्मद सिराजने एक धावा काढून नाबाद राहिला. अक्षर पटेलने 21 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी दोन बळी घेतले. रोमारियो शेफर्ड आणि अकील हुसेन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी