मुंबई : बीसीसीआयने (Bcci) झिंबाब्वेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी 15 सदस्यांचा भारतीय (Zim vs Ind) संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया (Team India) झिंबाब्वे (Zimbabwe) विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan) पुन्हा एकदा कर्णधार (captain) करण्यात आलंय. परंतु या संघातून परत एकदा केएल राहुलचं नाव गायब झालेलं दिसत आहे.
विंडिजला 3-0 ने पराभूत केल्यानंतर याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा मानस टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा असणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मासह अनुभवी खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंची एन्ट्री झाली आहे.
दोन खेळाडूंची एन्ट्री
या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात 2 स्टार खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चाहरचे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोघे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते. तर राहुल त्रिपाठीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. टीम इंडियाचा विंडिज दौरा 7 ऑगस्टला संपणार आहे. यानंतर भारतीय संघ झिंबाब्वे दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान तरुण खेळाडू यात दिसत असताना केएल राहुल मात्र या संघातून बाहेर झालेला दिसत आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी केएल राहुल भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे, परंतु त्याचा फिटनेस हा चिंतेचा विषय आहे.
राहुल वेस्ट इंडिज दौऱ्यावर T20 संघाचा भाग असणार होता, परंतु COVID-19 च्या संसर्गामुळे तो मालिकेतून बाहेर पडला. राहुलच्या जागी संजू सॅमसनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. झिम्बाब्वेविरुद्धच्या संघात राहुलचा समावेश होण्याची शक्यता होती, मात्र या दौऱ्यासाठी त्याची निवड का करण्यात आली नाही, हे आता समोर आले आहे. केएल राहुल कंबरेच्या दुखापतीने त्रस्त आहे आणि त्यामुळे त्याची निवड झालेली नाही, अशी माहिती एका सूत्राकडून मिळाली आहे.
Read Also : उच्च कोलेस्टेरॉलचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? तीन लक्षणे
केएल राहुल यावर्षी भारत खेळत असलेल्या सातव्या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. म्हणजेच केएल राहुल सहा सामना मालिकेपासून बाहेर बसलेला आहे. दरम्यान, आता आशा आहे की केएल राहुल पूर्ण तंदुरुस्ती मिळवेल आणि आशिया चषकासाठी भारतीय संघात परतेल. याचदरम्यान, केएल राहुलने ट्विट करून त्याच्या फिटनेसबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Read Also : शिवसैनिकांनी राज्यपालांसाठी काढला कोल्हापुरी जोडा
'मला माझ्या फिटनेस आणि आरोग्याबाबत काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. जूनमध्ये माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर परतण्यासाठी सराव सुरू केला. मी पूर्ण फिटनेस गाठण्याच्या जवळ होतो, पण दुर्दैवाने कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे मला काही आठवडे मागे ढकलले. पण माझे उद्दिष्ट शक्य तितक्या लवकर बरे होणे आणि निवडीसाठी उपलब्ध असणे हे आहे. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि मी परत येण्यासाठी उत्सुक आहे.
Read Also : मला काही झाले तर नाना पाटेकर जबाबदार असेल: तनुश्री दत्ता
पहिली वनडे- 18 ऑगस्ट 2022, हरारे
दुसरी वनडे - 20 ऑगस्ट 2022, हरारे
तिसरी वनडे-
22 ऑगस्ट 2022, हरारे
भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने दुपारी १२.४५ वाजता सुरू होतील.
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.