भारत ४ बाद १२५, पावसाचा व्यत्यय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला. दिवसअखेर भारताने ४ बाद १२५ अशी मजल मारली.

India trail by 58 runs in India v England 1st Test Cricket Match 2nd Day
भारत ४ बाद १२५, पावसाचा व्यत्यय 

थोडं पण कामाचं

  • भारत ४ बाद १२५, पावसाचा व्यत्यय
  • इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत आटोपला
  • भारतीय संघ अद्याप ५८ धावांनी पिछाडीवर

ट्रेंट ब्रिज: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला. दिवसअखेर भारताने ४ बाद १२५ अशी मजल मारली. भारताचा पहिला डाव सुरू आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांत आटोपला. भारतीय संघ अद्याप ५८ धावांनी पिछाडीवर आहे. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी ४६.१ षटकांचा खेळ झाला. India trail by 58 runs in India v England 1st Test Cricket Match 2nd Day

मेस्सी बार्सिलोना संघ सोडणार

टोकियो ऑलिम्पिक - भारतीय पदकविजेते

रोहित शर्मा ३६ धावा करुन रॉबिनसनच्या चेंडूवर सॅम करणकडे झेल देऊन परतला. चेतेश्वर पुजारा चार धावा करुन जेम्स अँडरसनच्या चेंडूवर जोस बटलरकडे झेल देऊन माघारी आला. कर्णधार विराट कोहली शून्य धावा करुन जेम्स अँडरसनच्या चेंडूवर जोस बटलरकडे झेल देऊन परतला. अजिंक्य रहाणे पाच धावा करुन धावचीत झाला. केएल राहुल (नाबाद ५७ धावा) आणि रिषभ पंत (नाबाद ७ धावा) खेळत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी