मुंबई: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये(icc u19 world cup 2022) भारताने(india) सलग दुसरा विजय मिळवला आहे. बुधवारी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात कोरोनाबाधित असलेल्या टीम इंडियाने आयर्लंडला(india vs ireland) १७४ धावांनी हरवले. भारतीय संघाने या विजयासह सुपर लीग स्टेजसाठीही(super league stage) क्वालिफाय केले आहे. भारतीय संघ दोन सामने जिंकत ग्रुप बीमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताकडून हरनूर सिंहने सर्वाधिक ८८ धावा केल्या तर अंगक्रिश रघुवंशीने ७९ धावांची खेळी केली. याशिवाय गोलंदाजीत सांगवान, अनीश्वर आणि तांबे यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. india u19 team won match againts ireland by 174 runs
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताने जबरदस्त कामगिरी करताना आपला विजयी रथ कायम ठेवला आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी करत १७४ धावांनी आयर्लंडला धूळ चारली. या विजयासह भारतीय संघाने सुपर लीग स्टेजसाठी क्वालिफाय केले आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताच्या संघाने ५० षटकांत ५ बाद ३०७ धावा केल्या. भारताची सलामीची जोडी चमकली. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने ७९ तर हरनूर सिंहने ८८ धावा केल्या. राज बावाने ४२ धावांची खेळी करत धावसंख्या वाढवण्यास मदत केली. निशांत सिंधूने ३६ धावांची खेळी केली. तर राजवर्धन हंर्गर्गेकरने ३९ धावा केल्या.
त्यानंतर आयर्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. आयर्लंडकडून एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. आर्यलंडकडून स्कॉट मॅकबेथने ३२ आणि विकेटकीपर जोशुआ कोक्सने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आर्यलंडचा डाव ३९ षटकांत केवळ १३३ धावांमध्ये तंबूत परतला.
गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यांमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करत भारतीय संघाला प्रथम फलंदाज करण्याची संधी दिली. भारताने टीम इंडिया 46.5 ओव्हरमध्ये सर्व बाद होत 232 धावा केल्या.