IND vs AFG: भारतासमोर आज अफगाणिस्तानचे आव्हान, कोणाचे पारडे आहे जड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 03, 2021 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Afghanistan head to head records and stats: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज टी-२० वर्ल्डकप २०२१च्या सुपर राऊंडचा सामना खेळवला जाणार आहे. जाणून घ्या आकड्यांमध्ये कोणाचे पारडे जड आहे. 

india vs afganistan
IND vs AFG: भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, कोणाचे पारडे जड 
थोडं पण कामाचं
  • भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज टी-२० वर्ल्डकप सामना
  • भारतीय संघाला सुरूवातीच्या दोन सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला
  • अफगाणिस्तानने तीनपैकी दोन सामने जिंकलेत.

India vs Afghanistan Head to Head and Stats:भारत(india) आणि अफगाणिस्तान(afganistan) यांच्यात आज टी-२० वर्ल्डकपच्या(t-20 world cup 2021)) सुपर १२ राऊंडचे मुकाबले खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ(indian team) आज आपला तिसरा तर अफगाणिस्तान चौथा सामना खेळणार आहे. भारताला जर सेमीफायनलच्या(semifinal) शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानला मोठ्या अंतराने हरवावे लागेल. india vs afganistan today head to head in t-20 world cup match 2021

भारतीय संघाला अद्याप विजयाचे खाते खोलता आलेले नाही. याशिवाय त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. तर अफगाणिस्तानने तीन पैकी दोन सामन्यांत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आजचा सामना जिंकावाच लागेल. दोन्ही संघांमध्ये हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. ग्रुप २मध्ये पहिले दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अशातच भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यांच्या आकड्यांवर एक नजर टाकूया.

भारताचा परफेक्ट रेकॉर्ड 

दोन्ही संघांची आकडेवारी पाहता भारतीय संघाकडे आज विजयाची शानदार संधी आहे. आतापर्यंत दोन्ही संघादरम्यान दोनच आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने दोनही सामने जिंकले आहेत. हे दोन्ही सामने आयसीसी टी-२० वर्ल्डकपदरम्यान खेळवण्यात आले होते. दोन्ही संघ पहिल्यांदा २०१०च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये भिडले होते. तेव्हा भारताने अफगाणिस्तानला ३१ चेंडू राखत ७ विकेटनी मात दिली होती. अफगाणिस्तानने १ मे २०१०मध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ८ बाद ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १४.५ ओव्हरमध्ये ३ बाद ११६ धावा केल्या होत्या. 

यानंतर दोन्ही संघ दुसऱ्यांदा १९ सप्टेंबर २०१२मध्ये आयसीसीच्या वर्ल्ड टी-२०मध्ये भिडले होते. तेव्हा भारताने कोलंबोमद्ये पहिल्यांदा फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ५ बाद १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ १९.३ ओव्हरमध्ये १३६ धावांवर ऑलआऊट झाला होता. भारताने हा सामना २३ धावांनी जिंकला होता. 

प्रत्येक बाबतीत टीम इंडिया पुढे

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आकडा पाहिला असता ब्लू टीमचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. दोन्ही संघादरम्यान एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता.. हा सामना भारताने एक डाव आणि २६३ धावांनी जिंकला होता. याशिवाय दोन्ही संघादरम्यान एकूण तीन वनडे सामने खेळवण्यात आले यात भारताने २-०ने विजय मिळवला होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दोन टी-२० खेळवण्यात आले. दोन्हीमध्ये भारताचा विजय झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी