IND vs AUS 1st ODI : हुश्श भारताने मारली बाजी, ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली वन डे जिंकली

India won by 5 wkts against Australia in 1st ODI at mumbai :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 3 मॅचच्या सीरिजमधील पहिली वन डे भारताने जिंकली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली वन डे 5 विकेट राखून जिंकली.

India won by 5 wkts against Australia in 1st ODI at mumbai
हुश्श भारताने मारली बाजी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हुश्श भारताने मारली बाजी
  • भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली वन डे जिंकली
  • ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 वन डे मॅचच्या सीरिजध्ये भारताने घेतली 1-0 अशी आघाडी

India vs Australia 1st ODI in Wankhede Stadium Mumbai, India won by 5 wkts against Australia in 1st ODI at mumbai : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या 3 मॅचच्या सीरिजमधील पहिली वन डे भारताने जिंकली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिली वन डे 5 विकेट राखून जिंकली. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळले. ऑस्ट्रेलियाची टीम 35.4 ओव्हरमध्ये सर्वबाद 188 धावा करू शकली. भारताने 39.5 ओव्हरमध्ये 5 बाद 191 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 81 धावा केल्या. जोश इंगलिसने 26 तर स्टीव्हन स्मिथने 22 धावा केल्या. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 3 तर रवींद्र जडेजाने 2 विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली. नंतर 189 धावांचे आव्हान घेऊन टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. ईशान किशन 3 तर शुभमन गिल 20 धावा करून परतला. विराट कोहली 4, सूर्यकुमार यादव शून्य आणि हार्दिक पांड्या 25 धावांचे योगदान देऊन परतले. केएल राहुलने नाबाद 75 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 45 धावा करून भारताचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 3 आणि स्टोइनिसने 2 विकेट घेतल्या.

रवींद्र जडेजा पहिल्या वन डे मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच (मॅन ऑफ द मॅच) पुरस्काराचा मानकरी झाला. जडेजाने पहिल्या वन डे मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या आणि नाबाद 45 धवा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - भारत 1 डाव आणि 132 धावांनी विजयी
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - भारत 6 विकेट राखून विजयी
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - ऑस्ट्रेलिया 9 विकेट राखून विजयी
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - ड्रॉ/अनिर्णित
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - भारत 5 विकेट राखून विजयी
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी