Nagpur Test controversy, India vs Australia 1st Test at Nagpur, Australian media made serious allegations against Ravindra Jadeja and Mohammed Siraj : नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच सुरू आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (BORDER GAVASKAR TROPHY 2023) 4 टेस्ट मॅचमधील ही पहिली मॅच आहे. या मॅचच्या पहिल्या दिवसापासूनच वादाला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने 2 भारतीय बॉलर्सवर गंभीर आरोप केला आहे.
रवींद्र जडेजाने मोहम्मद सिराजच्या मदतीने बॉल टॅम्परिंग केले, असा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे. हा आरोप करण्यासाठी ऑस्ट्रेलियन मीडिया मॅच दरम्यानच्या एका घटनेचा संदर्भ देत आहे. या घटनेचा व्हिडीओ ऑस्ट्रेलियन मीडियाकडून टीव्हीवर तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रॉडकास्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत असलेली घटना 16व्या ओव्हरमध्ये घडली आहे. घटना घडली त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 120 अशी होती. रवींद्र जडेजाने 30 रन्स देऊन ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना बाद केले होते. रवींद्र जडेजा बॉलिंगसाठी सज्ज होत होता. तेवढ्यात मोहम्मद सिराज जडेजाच्या जवळ आला. सिराजच्या हातात काही तरी चकाकत होते. ती चकाकणारी गोष्ट जडेजाने स्वतःच्या हाताच्या बोटांना लावली. नंतर त्याच बोटांनी जडेजाने बॉलला स्पर्श केला. रोहित शर्मा जडेजाशी बोलण्यासाठी आला. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांचे बोलणे झाले. यानंतर रवींद्र जडेजा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. याआधी त्याने चकाकणाऱ्या गोष्टीला स्पर्श केला होता नंतर त्याच बोटांनी बॉलला स्पर्श केला होता.
या व्हिडीओचा संदर्भ देत ऑस्ट्रेलियन मीडियाने बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात भारतीय खेळाडूंची बाजू अद्याप समजलेली नाही. बॉलला चकाकणारी गोष्ट लावणे हे नियमात बसत नाही. पण रवींद्र जडेजाने खरच चकाकणारी गोष्ट बॉलला लावली की नाही हे चौकशी झाल्यानंतर स्पष्ट होईल.
border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू
जगातील सर्वात सुंदर Railway Stations
तुर्कस्तान आणि सीरियात भारताचे ऑपरेशन दोस्त
आयसीसीने व्हिडीओ प्रकरणात चौकशी केली तर जडेजाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. चौकशी झाली तर जडेजाची बाजू अधिकृतरित्या आयसीसीच्या अधिकाऱ्यांना कळेल. पण त्याआधी आयसीसी व्हिडीओ प्रकरणात मैदानातील पंचांचे म्हणणे जाणून घेण्याची दाट शक्यता आहे. मैदानातील पंच व्हिडीओबाबत काय मत नोंदवतात यावरून पुढे काय घडणार याचा अंदाज येऊ शकेल. या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
नागपूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 रन्समध्ये आटोपला. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले. यानंतर भारताने दिवस संपेपर्यंत 1 बाद 77 रन्स केल्या. सध्या भारत 100 रन्सनी पिछाडीवर आहे. रोहित शर्मा 56 तर आर. अश्विन शून्य रन्सवर खेळत आहे. याआधी ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट करण्यात भारताकडून रवींद्र जडेजाने मोठी कामगिरी बजावली, त्याने 47 रन्स देऊन 5 विकेट घेतल्या. आर. अश्विनने 3 जणांना बाद केले. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.