IND vs AUS 1st Test : नागपूर टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत, भारतीय गोलंदाजांनी उडवली दाणादाण

India vs Australia 1st Test at Nagpur, live score, match update : नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच सुरू आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (BORDER GAVASKAR TROPHY 2023) 4 टेस्ट मॅचमधील ही पहिली मॅच आहे. या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. 

India vs Australia 1st Test at Nagpur
नागपूर टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • नागपूर टेस्ट मध्ये ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत
 • भारतीय गोलंदाजांनी उडवली दाणादाण
 • भारताने सलग ३ वेळा जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

India vs Australia 1st Test at Nagpur, live score, match update : नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट मॅच सुरू आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या (BORDER GAVASKAR TROPHY 2023) 4 टेस्ट मॅचमधील ही पहिली मॅच आहे. या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. 

टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज (बॅटर) 173 धावांत बाद झाले. भारताकडून मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला तर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद केले. आर. अश्विनने अॅलेक्स केरी, पॅट कमिन्सला बाद केले तर रवींद्र जडेजाने मार्नस लब्युशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, टॉड मर्फी या 4 जणांना बाद केले.  

मोठी धावसंख्या उभारण्यासाठी बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा धावा काढण्याचा वेग मंदावला. आता पीटर हँड्सकोम्ब आणि पॅट कमिन्स हे दोघे बॅटिंग करत आहेत. 

भारताने सलग ३ वेळा जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी

आतापर्यंत सलग ३ वेळा भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळत आहे. 

असे बाद झाले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज

 1. डेव्हिड वॉर्नर 1 धाव मोहम्मद शमीच्या बॉलवर बोल्ड
 2. उस्मान ख्वाजा 1 धाव मोहम्मद सिराजच्या बॉलवर एलबीडब्ल्यू
 3. मार्नस लब्युशेन 49 धावा रवींद्र जडेजाच्या बॉलवर विकेटकीपर श्रीकर भरतकरवी स्टम्पिंग
 4. स्टीव्हन स्मिथ 37 धावा रवींद्र जडेजाच्या बॉलवर बोल्ड
 5. मॅट रेनशॉ 0 धावा रवींद्र जडेजाच्या बॉलवर एलबीडब्ल्यू
 6. अॅलेक्स केरी 36 धावा आर. अश्विनच्या बॉलवर बोल्ड
 7. पॅट कमिन्स 6 धावा आर. अश्विनच्या बॉलवर विराट कोहलीने घेतला कॅच
 8. टॉड मर्फी 0 धावा रवींद्र जडेजाच्या बॉलवर एलबीडब्ल्यू

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

 1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - सकाळी 9.30
 2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - सकाळी 9.30
 3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम धरमशाला - सकाळी 9.30
 4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
 5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
 6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
 7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी