India vs Australia 2nd ODI in Visakhapatnam, India allout at 117 in 26 overs : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वन डे मॅचच्या सीरिजमधील दुसरी मॅच विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी फायद्याचा ठरला. टीम इंडिया 117 धावांत ऑलआऊट झाली.
प्रथम बॅटिंग करणाऱ्या भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. कॅप्टन असलेला रोहित शर्मा 13 धावा करून परतला. सलामीवीर शुभमन गिल शून्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादव पण शून्यावर बाद झाला. केएल राहुलने 9, हार्दिक पांड्याने 1, रवींद्र जडेजाने 16, अक्षर पटेलने नाबाद 29, कुलदीप यादवने 4, मोहम्मद शमीने शून्य आणि मोहम्मद सिराजने शून्य धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याने रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, मोहम्मद सिराज या 5 जणांना बाद केले. सिआन अॅबॉटने हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या तिघांना बाद केले. तर नॅथन एलिसने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोघांना बाद केले.
भारताचा डाव लवकर आटोपल्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 50 ओव्हरमध्ये 118 धावांचे माफक आव्हान आहे. ही मॅच जिंकल्यास 3 वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची 1-1 अशी बरोबरी होईल आणि चेन्नईत होणार असलेल्या मॅचचे महत्त्व वाढेल. पण भारताने विशाखापट्टणममध्ये विजय मिळवला तर टीम इंडिया सीरिज 2-0 अशी जिंकेल.
बिर्याणीचे हे प्रकार माहिती आहेत का?
एप्रिल महिन्यात फिरण्याची भारतातील उत्तम ठिकाणे