India vs Australia 2nd Test at Arun Jaitley Stadium Delhi Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023' ही 4 टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट मॅच नागपूरमध्ये झाली. ही मॅच 1 डाव आणि 132 धावांनी जिंकून भारताने सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी टेस्ट मॅच शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 पासून दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. । क्रीडा / क्रिकेटकिडा । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दिल्ली टेस्ट : LIVE SCORE
दिल्ली टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. नंतर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 262 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला. दिल्ली टेस्टचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 1 बाद 61 धावा केल्या होत्या. भारता विरोधात ऑस्ट्रेलियाने 62 धावांची आघाडी घेतली होती.