India vs Australia Ahmedabad Test, Australia hold on to a draw in Ahmedabad as India take series 2-1, India reach WTC final after Sri Lanka defeat : भारत सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकला. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-1 अशी जिंकली. भारतात सुरू असलेली 4 टेस्ट मॅचची सीरिज संपली. सीरिजमधील शेवटची टेस्ट मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाली. ही मॅच ड्रॉ झाली. पण नागपूर आणि दिल्ली टेस्ट भारताने तर इंदूरची टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली असल्यामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर चौथ्यांदा भारताने नाव कोरले.
भारताने 2017 आणि 2023 मध्ये घरच्या मैदानावर तर 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या पद्धतीने भारताने सलग चार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकल्या.
अहमदाबाद टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 480 धावा केल्या. या धावसंख्येला उत्तर देत भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात 2 बाद 175 धावा एवढी मजल मारली. पाच दिवसाचा खेळ संपला तरी मॅच अनिर्णित होती त्यामुळे अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाली.
हॅगले ओव्हल येथे झालेल्या टेस्टमध्ये पावसाचा व्यत्यय आला. या व्यत्ययानंतर न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला. न्यूझीलंडने शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा 2 विकेट राखून पराभव केला. यामुळे अहमदाबाद टेस्टचा निकाल लागण्याआधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार असलेल्या दोन्ही टीम निश्चित झाल्या. अहमदाबाद टेस्ट ड्रॉ झाल्यानंतरही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमधील पहिल्या दोन्ही टीम आपापल्या स्थानी कायम आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असतील.
या ब्रँडची मूळ नावं माहिती आहेत का?