IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकणाऱ्या भारतासाठी दिल्ली टेस्टआधी आनंदाची बातमी

India vs Australia, Good News For Team India Before Delhi Test Match : भारत आणि ऑस्ट्रेलिया शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 पासून दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर दुसरी टेस्ट मॅच खेळणार आहेत. ही मॅच जिंकल्यास भारत 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023' ही 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-0 अशी जिंकेल. यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचचे महत्त्व वाढले आहे. ही महत्त्वाची मॅच होण्याआधीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

India vs Australia, Good News For Team India Before Delhi Test Match
भारतासाठी दिल्ली टेस्टआधी आनंदाची बातमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट जिंकणाऱ्या भारतासाठी दिल्ली टेस्टआधी आनंदाची बातमी
  • दुखापतीमुळे टीम बाहेर असलेला श्रेयस अय्यर फिट झाला
  • दिल्लीच्या टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असेल श्रेयस अय्यर

India vs Australia, Good News For Team India Before Delhi Test Match : भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची नागपूर टेस्ट 1 डाव आणि 132 धावांनी जिंकली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 पासून दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर दुसरी टेस्ट मॅच खेळणार आहेत. ही मॅच जिंकल्यास भारत 'बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023' ही 4 टेस्ट मॅचची सीरिज 2-0 अशी जिंकेल. यामुळे दुसऱ्या टेस्ट मॅचचे महत्त्व वाढले आहे. ही महत्त्वाची मॅच होण्याआधीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे टीम बाहेर असलेला श्रेयस अय्यर फिट झाला आहे. तो दिल्लीच्या टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असेल. 

श्रेयस अय्यर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबसाठी दाखल झाला होता. आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमने श्रेयस फिट असल्याचे सांगितले आहे. तो दिल्लीत टीम इंडियात दाखल होणार आहे. श्रेयस परतल्यामुळे टीम इंडियाच्या मधल्या फळीची ताकद वाढणार आहे. 

प्रसिद्ध कृष्णा आणि जयदेव उनाडकट हे दोन्ही बॉलर दुखापतीमुळे दिल्ली कसोटीसाठी उपलब्ध नसतील. पण नागपूर टेस्टमध्ये खेळलेल्या सर्व बॉलरची कामगिरी बघता 2 बॉलरच्या दुखापतीमुळे टीम इंडिया जास्त चिंतेत नसेल. श्रेयस अय्यर परतल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. दिल्लीचे मैदान स्पिनर्ससाठी अनुकूल असेल असा अंदाज आहे.

श्रेयस अय्यर भारताकडून 7 टेस्टमध्ये 12 डावात 624 धावा केल्या आहेत. यात 1 सेंच्युरी (शतक) आणि 5 हाफ सेंच्युरी (अर्धशतक) यांचा समावेश आहे. 105 ही श्रेयसची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

दिल्ली टेस्टसाठी अंतिम टीम या भारतीय क्रिकेटपटूंमधून निवडली जाणार...

भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजार, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?

तिसरी टेस्ट मॅच धरमशाला ऐवजी इंदूरमध्ये होणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच धरमशाला ऐवजी इंदूरमध्ये होणार आहे. धरमशाला येथील स्टेडियमच्या आऊटफिल्ड आणि ड्रेनेज सिस्टिममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर अद्याप धरमशालाचे मैदान आंतरराष्ट्रीय मॅचसाठी सज्ज झालेले नाही. यामुळे तिसरी टेस्ट मॅच धरमशाला ऐवजी इंदूरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू

WPL : T20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या या भारतीय महिला क्रिकेटपटूंना झाला फायदा

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (अपडेट)

  1. गुरुवार 9 फेब्रुवारी 2023 ते सोमवार 13 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली टेस्ट, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम नागपूर - 1 डाव आणि 132 धावांनी भारताचा विजय
  2. शुक्रवार 17 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी टेस्ट, अरुण जेटली स्टेडियम दिल्ली - सकाळी 9.30
  3. बुधवार 1 मार्च 2023 ते रविवार 5 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी टेस्ट, होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर - सकाळी 9.30
  4. गुरुवार 9 मार्च 2023 ते सोमवार 13 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत चौथी टेस्ट, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद - सकाळी 9.30
  5. शुक्रवार 17 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिली वन डे, वानखेडे स्टेडियम मुंबई - दुपारी 2
  6. रविवार 19 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वन डे, डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए - व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम - दुपारी 2
  7. बुधवार 22 मार्च 2023 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसरी वन डे, एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई - दुपारी 2

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी