India vs Australia, 1st ODI Live Score: ऑस्ट्रेलिया पुढे 255 धावांचं आव्हान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 14, 2020 | 18:12 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

India (IND) vs Australia (SL) 1st ODI, Live Cricket Score: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या तीन सामन्याच्या वन डे सिरीजचा पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. 

India vs Australia
LIVE: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताची पहिली बॅटिंग  |  फोटो सौजन्य: AP

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन मॅचच्या वन डे सिरीजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या होणाऱ्या या दुरंगी लढतीत काही खेळाडू समोरासमोर देणार आहेत. यात रोहित शर्मा डेव्हिड वॉर्नर तसेच विराट कोहली आणि स्टीव स्मिथ यांच्यात लढत होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचे जलद गोलंदाजी ठरणार अडचणी? 

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी हे भारतीय गोलंदाजीचे आक्रमण ऑस्ट्रेलिया फलंदाजीची मोठी चाचणी परीक्षा आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स, केन रिचर्डसन आणि अनुभवी मिचेल स्टार्क सारखे गोलंदाज आहेत. जे कोहली आणि त्याच्या टीमला अडचणीत आणू शकतात. 

अॅलेक्स कॅरीची आक्रमक फलंदाजी आणि शानदार विकेटकिपिंग भारताच्या रिषभ पंतला कडवे आव्हान आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये छाप छोडणारा ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लाबुशेन आपल्या छोट्या प्रारूपमध्ये पदार्पण करणार आहे. 

सलामी जोडी कोण

 विराट कोहलीन स्पष्ट केले की शिखर धवन, केएल राहुल आणि रोहित शर्मा तिघे एकत्र खेळणार आहेत. तर विराट कोहली स्वतः खाली खेळणार आहे. कोहलीने संकेत दिले की ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या वन डेमध्ये शिखर धवन आणि लोकेश राहुलला जागा देण्यासाठी तो खालच्या क्रमांकावर येऊ शकतो. 

अय्यरची चांगली कामगिरी विराटसाठी अडचणीची 

वर्ल्ड कपमध्ये धवन खेळत असताना राहुल चौथ्या क्रमांकावर कामचलाऊ खेळायला आला होता. पण या वेळी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत असल्याने धवन किंवा राहुल यापैकी एकाला अंतीम ११ मध्ये जागा मिळणार आहे. 

असा असेल संघ 

भारत: विराट कोहली (कप्तान), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कप्तान), एश्टन एगर, एलेक्स केरी, पैट कमिंस, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी