IND vs Aus Women's T20 Semifinal in Marathi: ICC T20महिला विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियासह (Team India)सर्व भारतीयांचं विश्वविजेता (world champions) होण्याचं स्वप्न भंगलं. अवघ्या पाच धावांनी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाच्या (Australia)संघाने टी20 महिला विश्वचषकातील (Women's T20 World Cup) भारतीय महिला संघाचा प्रवास संपवला. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. न्यूलँड्स (Newlands)येथील केप टाउन स्टेडियमवर (Cape Town Stadium) हा सामना झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. या बाद फेरीतील सामन्यात भारतीय संघाकडून काही चुका झाल्या आहेत, ज्यामुळे भारताचा पराभव झाला. टीम इंडिया पराभूत झाली याची काही कारणे समोर आली आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत..
अधिक वाचा : स्वस्तातील हनीमूनसाठी भारतातील या ठिकाणी जा
केपटाऊनमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनल्सच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 172 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला 173 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऑस्ट्रेलियन संघाकडून बेथ मूनीने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याचबरोबर मेग लॅनिंगने नाबाद राहत 49 धावा केल्या.
अधिक वाचा : दीपक चहरचे पत्नीसोबत Romantic फोटो; कोणाची नजर न लागो या जोडप्याला
ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियानं पहिले तीन विकेट 28 धावात गमावले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूत 52 धावा आणि जेमिमाह रॉड्रिग्जने 24 चेंडूत 43 धावा करत संघाला सांभाळलं. परंतु त्याचा तितका फायदा झाला नाही. प्रत्युत्तरात भारतीय संघ 20 षटकांत 8 बाद 167 धावाच करू शकला.
भारताने सेमीफायनल सामन्यात भारताकडून दमदार खेळाची अपेक्षा होती. परंतु भारतीय गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार धुलाई केली. भारताने 5 गोलंदाज खेळवले आणि या सर्व गोलंदाजांनी 4 षटकात प्रत्येकी किमान 30 धावा दिल्या. यात सर्वात महागडी रेणुका सिंह ठरली. तिने शेवटच्या षटकात 18 तर एकूण 41 धावा दिल्या. यासोबत फिल्डिंग करताना सामन्यात झेल, स्टम्पिंगच्या संधी सोडल्या आणि गचाळ क्षेत्ररक्षण करत भारतीय संघाने धावाही दिल्या.
अतिशय महत्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पडले. शफाली वर्मा, स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया स्वस्तात बाद झाल्या. तिघींनी मिळून फक्त 15 धावा केल्या. या तिघी बाद झाल्यानंतर जेमिमाह आणि हरमनप्रीत यांनी डाव सावरला पण भारताला पराभवाला समोरे जावे लागले.
अधिक वाचा : या आहेत जगातील टॉप-9 महिला क्रिकेटपटू
भारत सेमीफायनल सहज जिंकणार असं वाटत असतानाच १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत धावबाद झाली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही धावबाद झाल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला.
भारताच्या डावातील हरमनप्रीतनंतर ऋचा घोषची विकेट मोठा टर्निंग पॉइंट ठरली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर जोपर्यंत ऋचा घोष मैदानात होती तोपर्यंत भारत जिंकेल असं वाटत होतं. पण 16 व्या षटकात अखेरच्या चेंडूवर डार्सी ब्राउनने तिला बाद केलं.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या दोन षटकात 19 धावा वाचवायच्या होत्या तर भारताला विजयासाठी 20 धावा हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने जेस जोनासनकडे चेंडू सोपवले. तिने या षटकात फक्त 4 धावा देल्या आणि अखेरच्या चेंडूवर स्नेह राणाची विकेट घेतली.