IND vs BAN: टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 07, 2019 | 22:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs BAN 2nd T-20I: भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. 

india vs bangladesh 2nd t20i match score updates in marathi cricket news
IND vs BAN: टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय (फोटो सौजन्य: @BCCI)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय
  • रोहित शर्माने खेळली जबरदस्त इनिंग
  • मॅचमध्ये रोहित शर्मा ठरला हिट
  • सीरिजमध्ये टीम इंडियाने केली 1-1 ने बरोबरी

राजकोट: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात टी-20 सीरिजमधील दुसरी टी-20 मॅच राजकोट येथे खेळण्यात आली. या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला आहे. बांगलादेशने दिलेल्या 154 रन्सचं आव्हान टीम इंडियाने 15.4 ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. टीम इंडियाकडून हिटमॅन रोहित शर्माने जबरदस्त इनिंग खेळत 43 बॉल्समध्ये 85 रन्स केले. रोहित शर्माने खेळलेल्या या धमाकेदार इनिंगमुळे टीम इंडियाला बांगलादेशवर अगदी सहज विजय मिळवता आला.

मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या टीमने प्रथम बॅटिंग करत 6 विकेट्स गमावत 153 रन्स केल्या आणि टीम इंडियाला विजयासाठी 154 रन्सचं आव्हान दिलं. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहलने दोन विकेट्स तर दीपक चहर, खलिल अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

बांगलादेशच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी खूपच चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने धडाकेबाज बॅटिंग करत बांगलादेशच्या बॉलर्सला चांगलाच घाम फोडला. रोहितने 43 बॉल्समध्ये 85 रन्स केल्या. या इनिंगमध्ये रोहित शर्माने 6 चौकार आणि 6 सिक्सरही लगावले. रोहित शर्माला शिखर धवनने चांगली साथ दिली. शिखर धवनने 27 बॉल्समध्ये 31 रन्स केल्या.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 मॅचेसच्या सीरिजमध्ये पहिली मॅच बांगलादेशने जिंकली होती. पहिल्या मॅचममध्ये बांगलादेशने टीम इंडियावर 7 विकेटसने विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. आता सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी झाली आहे त्यामुळे आता तिसरी आणि शेवटची मॅच निर्णायक ठरणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरी टी-20 मॅच नागपूर येथे 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी