पहिल्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेश ऑलआऊट; भारत बिनबाद 19

India vs Bangladesh 2nd Test Shere Bangla National Stadium Dhaka Live Score : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच आजपासून (गुरुवार 22 डिसेंबर 2022) सुरू.

India vs Bangladesh 2nd Test
भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आजचा खेळ संपला, बांगलादेश ऑलआऊट; भारत बिनबाद 19
  • बांगलादेश 227 धावांत ऑलआऊट
  • भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर आणि Sony LIV अॅपवर थेट प्रक्षेपण

India vs Bangladesh 2nd Test Shere Bangla National Stadium Dhaka Live Score : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच आजपासून (गुरुवार 22 डिसेंबर 2022) सुरू झाली आहे. या मॅचचा लाईव्ह स्कोअर बघण्यासाठी क्लिक करा.

India vs Bangladesh 2nd Test Shere Bangla National Stadium Dhaka Match Preview, Pitch Report, Weather Report, Dream 11 Team : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी टेस्ट मॅच आजपासून (गुरुवार 22 डिसेंबर 2022) सुरू होत आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील शेरे बांग्ला स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. मॅचचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर सुरू होईल. तसेच मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Live streaming) सोनी लिव्ह (Sony LIV) या अॅपवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल.

दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमधील पहिली टेस्ट भारताने 188 धावांनी जिंकली आहे. यामुळे सीरिजमध्ये भारताकडे 1-0 अशी आघाडी आहे. दुसरी टेस्ट जिंकून भारत बांगलादेशला व्हाईटवॉश देणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अर्थात WTCच्या फायनलमध्ये दाखल होण्यासाठी भारताला सहा पैकी पाच टेस्ट मॅच जिंकणे आवश्यक आहे. भारत आता बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. या सीरिजची पहिली मॅच जिंकून भारताने चांगली सुरुवात केली आहे. भारताला बांगलादेश विरुद्ध ढाक्यात दुसरी टेस्ट खेळायची आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार टेस्ट मॅचची सीरिज खेळायची आहे. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमधील कामगिरीच्या जोरावर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्वतःची कामगिरी सुधारू शकणार आहे. यामुळेच भारतासाठी बांगलादेश विरुद्धची टेस्ट सीरिज महत्त्वाची आहे. या सीरिजमध्ये विजयाने सुरुवात करून टीम इंडियाने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत. 

करिअरमध्ये एकही सिक्स न मारलेले बॅटर

फलंदाज किती प्रकारे होऊ शकतो आऊट

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट, पिच रिपोर्ट (India vs Bangladesh 2nd Test, Pitch Report)

ढाका येथील शेरे बांग्ला स्टेडियमचे पिच बॉलर्ससाठी उत्तम आहे. मॅचच्या पहिल्या दिवशी जी टीम बॅटिंग करेल त्या टीमला शक्य तितक्या लवकर मोठा स्कोअर उभारणे फायद्याचे ठरेल. जसजसा वेळ जाईल बॉलर्सचा प्रभाव वाढेल आणि धावा वेगाने वाढवणे कठीण होईल असा अंदाज आहे.

भारत-बांगलादेश दुसरी टेस्ट, वेदर रिपोर्ट (India vs Bangladesh 2nd Test, Weather Report)

टेस्ट दरम्यान पाचही दिवस पावसाची शक्यता नाही. पहिल्या दिवशी दीर्घकाळ ढगाळ आकाश आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. टेस्टच्या पाच दिवसांदरम्यान कमाल तापमान 27 ते 28 अंश से. आणि किमान तापमान 16 ते 19 अंश से. राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

  1. संभाव्य 11 खेळाडू भारत (Dream 11 Team India) : शुभमन गिल, केएल राहुल (कॅप्टन), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज
  2. संभाव्य 11 खेळाडू बांगलादेश (Dream 11 Team Bangladesh) : महमूदुल हसन, जाकिर हसन, नजमुल हुसेन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शाकिब अल हसन (कप्तान), मेहदी हसन, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, तस्किन अहमद/नसूम अहमद
  3. भारत (India Squad) : केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, सौरभ कुमार , श्रीकर भरत, अभिमन्यू ईश्वरन
  4. बांगलादेश (Bangladesh Squad) : नजमुल हुसेन शान्तो, जाकिर हसन, यासिर अली, लिटन दास, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन (कप्तान), नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसूम अहमद, तस्कीन अहमद, महमूदुल हसन जॉय, रेजौर रहमान राजा, मोमिनुल हक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी