T20 WC: IND-BAN सामन्याच्या निकालावर ठरणार भारताचे भविष्य

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2022 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs BAN, T20 WC 2022: भारतीय क्रिकेट संघ टी20 वर्ल्ड कपमध्ये आज 2 नोव्हेंबरला बांगलादेशचा सामना करणार आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजय अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र तेथील हवामान चाहत्यांची मजा किरकिरी करू शकते. 

team india
T20 WC: IND-BAN सामन्याच्या निकालावर ठरणार भारताचे भविष्य 
थोडं पण कामाचं
  • भारतीय संघाने आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत
  • भारतीय संघाला गेल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता.
  • त्याआधी पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती.

मुंबई: रोहित शर्माच्या(rohit sharma) नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघाी टी20 वर्ल्डकपमधील(t-20 world cup 2022) कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. ते अद्यापही सेमीफायनलच्या(semifinal) शर्यतीत टिकून आहेत. दरम्यान, भारताचा आज 2 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध(bangladesh) सामना होत आहे. दरम्यान, या सामन्यात पाऊस तसेच खराब हवामान चाहत्यांची सामन्याची मजा कमी करू शकतात. india vs bangladesh match will decide India's semifinal route

अधिक वाचा - कारमध्ये बसताना महिलेवर वाघाची झडप

अॅडलेडमध्ये होणार सामना

भारतीय संघाने आतापर्यंत टी20 वर्ल्ड कपमध्ये तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. भारतीय संघाला गेल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. त्याआधी पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. आता रोहित शर्मा अँड कंपनी आज बांगलादेशशी भिडत आहे. हा सामना अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. 

भारत दुसऱ्या स्थानावर

भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी बांगलादेशला हरवणे गरजेचे आहे. संघाचे सर्व 3 सामन्यात 4 अंक आहेत आणि तर सुपर 12 राऊंडमधील ग्रुप2च्या अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाचे तितकेच गुण आहेत. मात्र भारताचा रनरेट चांगला आहे. ग्रुप 2मध्ये बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे तर झिम्बाब्वे 3 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे 2 अंक झालेत तर नेदरलँड्सने अद्याप खाते खोललेले नाही. 

अधिक वाचा - शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार कॅमेऱ्यात

विजय-पराजय काय होणार?

भारतासाठी आता उरलेले दोन सामने अतिशय महत्त्वाचे आहेत. जर टीम इंडिया बांगलादेशला हरवत असेल तर त्यांचे 6 अंक होतील. यासोबतच ते ग्रुप 2मध्ये टॉपवर पोहोचतील . यानंतर भारतीय संघ मेलबर्नमध्ये 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना जिंकणेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, सध्या ग्रुप 2मध्ये टॉपवर असलेल्या द. आफ्रिकेचा पुढचा सामना 3 नोव्हेंबरला पाकिस्तानशी असणार आहे. ते जर या सामन्यात जिंकले तर ते 7 अंक असतील. यानंतर नेदरलँड्सविरुद्ध त्यांना जिंकणे तितकेसे अवघड असणार नाही. अशातच ते 9 अंकांसह टॉपर राहावे लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी