IND vs BAN: 'या' तीन चुका टीम इंडियाच्या पराभवासाठी कारणीभूत

IND vs BAN, 1st T-20I: बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाच्या या पराभवासाठी तीन कारणं कारणीभूत ठरली आहेत. जाणून घेऊयात कुठली आहेत ही कारण...

india vs bangladesh t20i first match delhi cricket news marathi google
बांगलादेशचा टीम इंडियावर विजय  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

 • बांगलादेशने टीम इंडिया विरुद्ध प्रथमच टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये मिळवला विजय
 • बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला मुश्फिकुर रहीम 
 • 60 रन्स बनवणारा मुश्फिकुर रहीम ठरला मॅन ऑफ द मॅच

मुंबई: बांगलादेशने प्रथमच टीम इंडियाचा टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पराभव केला आहे. बांगलादेश आणि टीम इंडिया यांच्यात झालेल्या टी-20 मॅचमध्ये बांगलादेशने टीम इंडियावर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच तीन मॅचेसच्या टी-20 सीरिजमध्ये बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर रविवारी झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीम याने विजयी इनिंग खेळली. या मॅचमध्ये टीम इंडिया विजयी झाली असती मात्र तीन चुका टीम इंडियाला महागात पडल्या.

 1. शिखर धवनचं रन आऊट होणं
  शिखर धवन रन आऊट जाल्याने टीम इंडियाला मोठं नुकसान झालं. हळू सुरुवात केल्यानंतरही धवनने टीमला सावरलं आणि 41 रन्स केले. शिखर धवन पीचवर सेट झालाच होता की त्यावेळी 15व्या ओव्हरमध्ये पंतने मिडविकेटच्या बाजुने शऑट खेळला आणि दोन रन्स घेण्याच्या नादात शिखर धवन आऊट झाला. धवन आऊट झाल्याने टीम इंडिया 15-20 रन्सने मागी पडली आणि याचा मोठा फटका टीमला बसला.
 2. मुश्फिकुर रहीमला मिळालेले जीवनदान 
  बांगलादेशच्या इनिंग दरम्यान 10व्या ओव्हरमध्ये जेव्हा मुश्फिकुर रहीम बॅटिंग करण्यासाठी आला तेव्हा चहलने लेग स्टम्प लाइनवर फुल लेंथ बॉल टाकला. रहीम यावेळी फ्लिक करण्यास गेला मात्र तो चुकला आणि बॉल पॅडला लागला. पंत आणि चहल यांनी अपील करण्याऐवजी मुश्फिकुरला रनआऊट करण्याकडे लक्ष दिलं. यावेळी रीप्लेमध्ये दिसलं की, बॉल स्टम्पला लागला अशता. यानंतर पुन्हा एकदा मुश्फिकुर एलबीडब्ल्यू होण्याची संधी आली. यावेळी सुद्धा पंत आणि चहल यांनी अपील केलं नाही आणि रीप्लेमध्ये दिसलं की बॉल स्टम्पवर आला असता. या दोन संधी गमावल्यानंतर 18व्या ओव्हरमध्ये क्रुणाल पांड्याने डीप मिडविकेटवर रहीमची कॅच सोडली.
 3. खलील अहमदची ओव्हर पडली महागात 
  इनिंगच्या 18व्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाच्या हातात मॅच होती. बांगलादेशला विजयासाठी 12 बॉल्समध्ये 22 रन्सची गरज होती. यावेळी 19वी ओव्हर खलील अहमद याने टाकली, मात्र, अनुभवाची कमी असल्याने शेवटच्या चार बॉल्सवर मुश्फिकुर रहीमने बाऊंड्री लगावल्या. या ओव्हरमध्ये एकूण 18 रन्स मिळवले. यानंतर बांगलादेशला विजयासाठी अवघ्या 4 रन्सची आवश्यकता होती. यावेळी महमुदुल्लाह याने सिक्सर लगावत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी