INDIA vs County XI:  विरुद्ध संघासाठी खेळत होता हा भारतीय क्रिकेटर, आता न्यावे लागले रुग्णालयात

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 21, 2021 | 15:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs County Select XI:भारताने टॉस जिंकत काऊंटी सिलेक्ट अंतिम ११ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या शतकामुळे भारताने पहिल्या दिवशी ९ विकेट गमावत ३०६ धावा केल्या.

match
विरुद्ध संघासाठी खेळत होता हा भारतीय क्रिकेटर, झाली दुखापत 

थोडं पण कामाचं

  • भारत आणि काऊंटी सिलेक्ट अंतिम ११ यांच्या तीन दिवसांचा सराव सामना
  • लोकेश राहुलचे शानदार शतक
  • विरुद्ध संघासाठी खेळत असलेल्या क्रिकेटरला दुखापत 

डरहम:  भारत आणि काऊंटी सिलेक्ट अंतिम ११ यांच्यात मंगळवारपासून सराव सामन्याला सुरूवात झाली. काऊंटी सिलेक्ट अंतिम ११ कडून भारताचा वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खानही खेळत होते. दरम्यान, वेगवान गोलंदाज आवेश खानच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयची मेडिकल टीम आवेश खानच्या स्थितीवर नजर ठेवून आहे. 

बीसीसीआयने आपल्या विधानात म्हटले की वेगवान गोलंदाज आवेश खानला पहिल्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी अंगठ्याला दुखापत झाली. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. भारताने काऊंटी सिलेक्ट अंतिम ११ विरुद्ध टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे पूर्णपणे फिट नव्हते त्यामुळे त्यांनी हा सराव सामना खेळण्याचा निर्णय घेतला नाहीी. रोहित शर्माने कॅप्टन्सी सांभाळली. 

रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मालाही यासराव सामन्यासाठी आराम देण्यात आला. त्याच्या जागी उमेश यादव, शार्दूल ठाकूर आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली. सराव सामन्यात भारताची सुरूवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा पुल शॉट खेळण्याच्या नादात ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर जेम्सने मयंक अग्रवालला क्लीन बोल्ड केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ९० षटकांत ३०६ धावा केल्या होत्या. 

कोरोनामधून बरा होत असलेला क्रिकेटर ऋषभ पंतच्या जागी खेळत असलेल्या लोकेश राहुलने संयमी खेळी करत संधीचा फायदा घेतला. त्याने अर्धशतकी खेळी केली. रवींद्र जडेजाच्या मदतीने त्याने डावा सांभाळला. मात्र काही वेळाने त्याने आपला वेग वाढवला. राहुलने १५० चेंडूत १०१ धावांची खेळी केली. 

यानंतर राहुलने आपली खेळी घोषित केली. ज्यामुळे इतर फलंदाजाना संधी मिळेल. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाही राहुलच्या रिटायर्ड आऊट झाल्यानंतर डाव संतुलित ठेवण्यासाठी वेग घेतला. त्याने शानदार अर्धशतक ठोकले आणि भारताचा स्कोर आणखी वाढवला. त्याने १४६ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी