India vs England 1st T20 Match Playing 11, Squad LIVE Updates: भारत-इंग्लंड पहिला T20 सामना आज, टीम इंडिया मारणार बाजी?

India vs England, IND vs ENG 1st T20 Match Squad, Players List, Playing 11, Pitch Report (भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना 2022) LIVE Updates: कसोटी सामन्यानंतर आता भारत आणि इंग्लंड यांच्यात T20 मालिका सुरु होणार आहे.उभय संघांमधला पहिला T20 सामना आज साउथम्प्टनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

india vs england 1st t20 match playing 11 squad live updates southampton rohit sharma hardik pandya joe root
भारत-इंग्लंड पहिला T20 सामना आज, टीम इंडिया मारणार बाजी? (BCCI) 
थोडं पण कामाचं
  • भारत वि. इंग्लंड पहिला टी-२० सामना साउथॅम्प्टनमध्ये
  • रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया भिडणार इंग्लंडच्या संघाला
  • टी-२० मालिका जिंकण्याचं टीम इंडियासमोर मोठं आव्हान

India vs England, IND vs ENG 1st T20 Match Squad, Players List, Playing 11, Pitch Report: यजमान इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यातील T20 मालिका आजपासून (७ जुलै) सुरू होणार आहे. तीन टी-20 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज साउथहॅम्प्टनच्या एजेस बाउल मैदानावर खेळवला जाणार आहे. एजबेस्टन कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाला आता मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचं उट्टं काढण्याची नामी संधी आहे. या मालिकेत टीम इंडिया पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळवला जाईल, तर उभय संघांमधील दुसरा टी-20 शनिवार आणि रविवारी खेळविण्यात येणार आहे. यावर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्या विजेतेपदासाठी इंग्लंडही प्रबळ दावेदार असेल, त्यामुळे या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी असेल.

इंग्लंडचा संघ सध्या नवे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरला असून ते पहिल्यांदाच टी-२० मालिकेत मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. जॉनी बेअरस्टोपासून जोस बटलर आणि जो रूटपर्यंत अनेक खेळाडू संघात आहेत जे टीम इंडियाला खडतर आव्हान देतील. दरम्यान, या मालिकेचा निकाल भारतीय संघाला पुढची रणनीती ठरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करेल.

एजेस बाउल ग्राउंड पिच रिपोर्ट (IND vs ENG 1st T20I पिच रिपोर्ट)

आज, भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना साउथहॅम्प्टनमधील एजेस बाउल मैदानावर खेळविण्यात येणार आहे. मात्र, या मैदानावर फलंदाजी करणं फार सोपं नाही. येथील खेळपट्टी गोलंदाजांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि फलंदाजांना मोठे फटके खेळताना संघर्ष करावा लागेल.

अधिक वाचा: Indian Team: टीम इंडियाला ही चूक नेहमीच पडते भारी, यावर नाही मिळत आहे उपाय

नुकत्याच झालेल्या इंग्लंड टी-20 लीगमध्ये येथे झालेल्या धावसंख्येवरून साऊथहॅम्प्टनमध्ये फलंदाजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो याची साक्ष आहे. या खेळपट्टीवर नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. कारण पाठलाग करणाऱ्या संघाला अलीकडे येथे फारसे यश मिळालेले नाही. 

जगातील सर्व मैदानांपैकी एक मैदान आहे की ज्याची सीमारेषा सर्वात लांब मानली जाते. अशा दोन्ही संघांमध्ये असलेले तगडे फलंदाज चौकार-षटकारांचा पाऊस कसा पाडतात हे पाहणे रंजक ठरेल.

आज साउथॅम्प्टनचे हवामान कसे असेल? (Southampton Weather Forecast Today 7th July 2022)

साउदम्प्टनमधील आजचे हवामान खूप चांगले राहण्याची अपेक्षा आहे. अंदाजानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्यादरम्यान वातावरण ढगाळ असेल. परंतु चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी चांगली बातमी अशी आहे की, इथे पाऊस अपेक्षित नाही. त्यामुळे हा संपूर्ण सामना पाहायला मिळू शकते. मात्र, येथील आर्द्रता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना नक्कीच त्रास देऊ शकते. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर आज येथील कमाल तापमान २४ अंश सेल्सियस आणि किमान तापमान १२ अंश सेल्सियस पर्यंत राहू शकते.

पहिल्या T20 साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक. 

यांच्यापैकी नेमक्या कोणाकोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचं हा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसमोर असणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी