IND vs ENG: टी-२०मध्ये भारत वि इंग्लंडमध्ये कोणाचे पारडे जड?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 07, 2022 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs ENG T20I Head to head: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतीला पहिला सामना गुरूवारी साऊथम्पटनमध्ये खेळवला जात आहे. जाणून घ्या दोन्ही संघामध्ये आतापर्यंत कसे सामने राहिले. 

india vs england
IND vs ENG: टी-२०मध्ये भारत वि इंग्लंडमध्ये कोणाचे पारडे जड? 
थोडं पण कामाचं
  • वर्ल्डकपची तयारीसाठी साहजिकच दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
  • या मालिकेत जिंकण्यासाठी दोन्ही संघ कोणतीही कसर सोडणार नाहीत.
  • जाणून घेऊया आतापर्यंत टी-२०मध्ये एकमेकांविरुद्ध या संघांची कामगिरी कशी राहिली. 

साऊथम्पटन: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिकेची सुरूवात गुरूवारपासून साऊथम्पटनमधील एजेस बाऊल स्टेडियममध्ये रंगणार आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचे यजमानपदाखाली आयोजित होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी दोन्ही संघामधील ही शेवटची मालिका असणार आहे. India vs england head to head match today

अधिक वाचा - रक्तातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दोन अस्त्रं

वर्ल्डकपची तयारीसाठी साहजिकच दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाच आहे. या मालिकेत जिंकण्यासाठी दोन्ही संघ कोणतीही कसर सोडणार नाहीत. अशातच जाणून घेऊया आतापर्यंत टी-२०मध्ये एकमेकांविरुद्ध या संघांची कामगिरी कशी राहिली. 

दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर

२००७मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपदरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्यांदा भिडंत झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत १५ वर्षांमध्ये दोन्ही संघ १९ वेळा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात आमनेसामने आले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत १९ वेळा टी-२० सामने खेळले आहेत. यात १० सामने टीम इंडियाने जिंकलेत तर ९मध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. अशातच दोघांमध्ये पुन्हा एकदा कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. 

भारताच्या नावावर मागील तीन मालिका

जर दोन्ही संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या गेल्या तीन टी-२० मालिकेचा विचार केला तर भारतीय संघाने सर्वांमध्ये विजय मिळवला. २०२१मध्ये भारत दौऱ्यावर इंग्लंडला २-३ या अंतराने हरवले होते. त्याने २०१८ या वर्षात इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. २०१६-१७मध्ये भारत दौऱ्यावर इंग्लंडला २-१ असा पराभव सहन करावा लागला होता. 

अधिक वाचा - बंडखोरी केलेल्या शिंदे गटाचा नेमका फायदा काय?

गेल्या ११ सामन्यांत भारताने ७ सामने जिंकलेत

दोन्ही संघादरम्यान खेळवण्यात आलेल्या गेल्या ११ सामन्यांपैकी ७मध्ये भारताने आणि ४मध्ये इंग्लंडच्या विजय मिळवला आहे. याने पाहिल्या टीम इंडियाचे पारडे जड वाटते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी