सकाळी 7 कॅच घेत झळकावली सेंच्युरी; संध्याकाळी मिळाली टीम इंडियात एन्ट्री

IND vs ENG T-20 series: इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार इनिंग खेळणाऱ्या ईशान किशनला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.

India vs England t20 series ishan kishan get placed in Team india after smashes 173 runs in vijay hazare trophy
फाईल फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • विजय हजारे ट्रॉफीत ईशान किशनची धमाल
  • 94 बॉल्समध्ये 173 रन्सची खेळली धमाकेदार इनिंग 
  • ईशान किशनच्या शानदार इनिंगमुळे टीम इंडियात मिळाली संधी

मुंबई : इंग्लंड (England) विरुद्धच्या आगामी टी-20 सीरिजसाठी (Ind vs Eng T-20 series) बीसीसीआय (BCCI)ने टीम इंडियाच्या (Team India) 19 सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. यावेळी बीसीसीआयने तीन नवीन प्लेअर्सला संधी दिली आहे. यामध्ये विकेटकीपर आणि बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) याचाही समावेश आहे. ईशान किशन याची पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ईशान किशन सध्या खूपच चांगल्या फॉर्मात आहेत. आयपीएलमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन दाखवले होते त्यानंतर आता शनिवारी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy)मध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

94 बॉल्समध्ये 173 रन्सची इनिंग 

22 वर्षीय ईशान किशन याने शनिवारी सकाळी होळकर स्टेडियमवर फोर आणि सिक्सर्सचा अक्षरश: पाऊस पाडल्याचं पहायला मिळालं. त्याने 94 बॉल्समध्ये 173 रन्स केले. यावेळी ईशानने 19 फोर आणि 11 सिक्सर लगावले. ईशान किशनने खेळलेल्या या इनिंगमुळेच त्याला टीम इंडियात संधी मिळाली आहे.

ईशान किशनच्या या जबरदस्त इनिंगमुळे झारखंडच्या टीमने 422 रन्सचा मोठा स्कोअर उभा केला आणि अखेर ही मॅच झारखंडने 324 रन्सने जिंकली. या मॅचमध्ये ईशान किशन याने 7 कॅचेसही घेतल्या. मॅच जिंकल्यामुळे झारखंडची टीम सेलिब्रेशन करत होती आणि त्याचवेळी संध्याकाळच्या सुमारास ईशान किशनसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे टीम सिलेक्टर्सने भारतीय टी-20 टीममध्ये त्याचं सिलेक्शन केलं आहे.

आयपीएल 2020 मध्येही ईशान किशनचा दमदार परफारर्मन्स

आयपीएल 2020 मध्ये ईशान किशन याने दमदार प्रदर्शन दाखवलं होतं. या सीझनमध्ये मुंबईच्या टीमसाठी सर्वाधिक रन्स करणारा तो बॅट्समन होता तसेच टूर्नामेंटमध्ये त्याने सर्वाधिक सिक्सर सुद्धा लगावले. ईशान किशन याने गेल्या सीझनमध्ये एकूण 14 मॅचेस खेळल्या होत्या आणि यामध्ये 36 फोर, 30 सिक्सरच्या मदतीने 57.33 च्या सरासरीने 516 रन्स केले. या दरम्यान त्याने चार हाफ सेंच्युरी केल्या. ईशान किशन याने 2016च्या आयपीएलमध्ये डेब्यू केलं होतं. त्याने आतापर्यंत 51 मॅचेस खेळल्या आहेत आणि सर्वोच्च स्कोअर 99 रन्स इतका आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी