IND vs HK: हाँगकाँगविरुद्ध अशी असणार भारताची प्लेंईंग ११, Rohit Sharma युवा खेळाडूंना देणार संधी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Aug 30, 2022 | 12:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Hong Kong Asia Cup 2022: भारताचा संघ ३१ ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध आशिया कपमध्ये सामना खेळणार आहे. यहा सामना जिंकत भारत आशिया कपमध्ये सुपर ४साठी क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणतीच कसर सोडणार नाही. हाँगकाँगविरुद्ध खराब फॉर्ममध्ये असलेले खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो

team india
IND vs HK: हाँगकाँगविरुद्ध अशी असणार भारताची प्लेंईंग ११ 
थोडं पण कामाचं
  • भारतासाठी ओपनिंग करण्यासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा उतरू शकतात.
  • पाकिस्तानविरुद्ध नंबर चारवर रवींद्र जडेजाला जागा मिळाली होती.
  • पाकिस्तानविरुद्ध सर्व गोलंदाजांनी चांगला खेळ केला होता.

मुंबई: भारतीय संघाने(indian team) आशिया कपमध्ये(asia cup) पाकिस्तानला(pakistan) जबरदस्त पद्धतीने धूळ चारली. भारताने या सामन्यात ५ विकेटनी विजय मिळवला. आता ३१ ऑगस्टला भारताचा सामना हाँगकाँगशी(india vs honk kong) रंगणार आहे. हा सामना जिंकत टीम इंडिया सुपर ४साठी क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी कर्णधार रोहित  शर्मा कोणतीच कसर सोडणार नाही. त्यामुळे खराब फॉर्मशी लढणाऱ्या अनेक खेळाडूंना प्लेईंग ११ बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. india vs hong kong match playing 11 

अधिक वाचा - BCCI कोहलीची मानसिकता करतेय कणखर, अॅप्टनकडे दिलीय जबाबदारी

अशी असेल टॉप ऑर्डर

भारतासाठी ओपनिंग करण्यासाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा उतरू शकतात. पहिल्या सामन्यात राहुल खाते न खोलताच बाद झाला होता. तर कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या लयीत दिसला होता. तिसऱ्या नंबरवर सुपरस्टार फलंदाज विराट कोहली उतरणे शक्य आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरूवात केली होती. मात्र तो मोठी खेळी करू शकला नव्हता. अशातच तो हाँगकाँगविरुद्ध आपल्या फॉर्मात परतेल. 

या खेळाडूंना मिडल ऑर्डरमध्ये मिळू शकते जागा

पाकिस्तानविरुद्ध नंबर चारवर रवींद्र जडेजाला जागा मिळाली होती. अशातच बॅटिंग ऑर्डरमध्ये लेफ्टराईट कॉम्बिनेशनसाठी कर्णधार त्याला चौथ्या स्थानावर संधी देऊ शकतो. सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुड्डाला संधी दिली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्ध सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नव्हता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच हार्दिक पांड्या हिरो ठरला होता. 

रोहितला या गोलंदाजांवर विश्वास

पाकिस्तानविरुद्ध सर्व गोलंदाजांनी चांगला खेळ केला होता. भुवनेश्वर कुमारने घातक गोलंदाजी करताना चार विकेट मिळवल्या होत्या. त्याशिवाय अर्शदीप सिंह आणि युझवेंद्र चहलनेही शानदार गोलंदाजी केली होती. आवेश खान महागडा खेळाडू ठरला होता. अशातच कर्णधार रोहित शर्मा आवेश खानच्या जागी स्पिनर रवीचंद्रन अश्विनला संधी देऊ शकतात. 

अधिक वाचा - आता सहजपणे मोबाइल नंबरद्वारे अपडेट करा आधार कार्डची माहिती

Hong Kong विरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघाचे संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, दीपक हु्ड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी