IND vs NZ 1st ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली वन डे, LIVE स्कोअरकार्ड

India vs New Zealand 1st ODI on Wednesday 18 January 2023 at Rajiv Gandhi International Stadium Hyderabad, scorecard : आज (बुधवार 18 जानेवारी 2023) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथे आहे.

IND vs NZ 1st ODI, Live scorecard
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली वन डे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IND vs NZ 1st ODI : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली वन डे
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच
  • पहिली मॅच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथे होणार

India vs New Zealand 1st ODI on Wednesday 18 January 2023 at Rajiv Gandhi International Stadium Hyderabad, Match Preview, Pitch Report, Weather Report : आज (बुधवार 18 जानेवारी 2023) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मॅचचे थेट प्रक्षेपण (Live Broadcast or Live Telecast) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर सुरू होईल. मॅच डीडी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर पण दाखवली जाईल. मॅचचे ऑनलाईन स्ट्रिमिंग (Live Streaming or Online Streaming) डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर दाखवले जाईल. मॅचचा टॉस दुपारी 1 वाजता होणार आहे. । स्कोअरकार्ड

भारताने श्रीलंकेविरुद्धची टी 20 सीरिज 2-1 अशी तर वन डे सीरिज 3-0 अशी जिंकली. लंकेविरुद्धची शेवटची वन डे भारताने विक्रमी 317 धावांनी जिंकली. या विजयानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 मॅचची वन डे सीरिज आणि 3 मॅचची टी 20 सीरिज होत आहे. या मॅचमधील पहिली वन डे मॅच आज आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली वन डे : वेदर रिपोर्ट (India vs New Zealand 1st ODI, Weather Report)

पहिल्या वन डे मॅचच्या ठिकाणी आज निरभ्र आकाश राहील. दुपारी टळटळीत सूर्यप्रकाशात खेळ होईल. पावसाची शक्यता नाही. मॅच सुरळीत पार पडेल. हैदराबादचे कमाल तापमान 31 अंश से. आणि किमान तापमान 16 अंश से. असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली वन डे : पीच रिपोर्ट (India vs New Zealand 1st ODI, Pitch Report)

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद येथील पिच स्पिनर्ससाठी फायद्याचे समजले जाते. या पिचवर खेळताना बॅटरना आव्हानांचा सामना करावा लागतो. आतापर्यंत या स्टेडियमवर झालेल्या 6 वन डे मॅचपैकी 3 मध्ये भारताचा पराभव झाला तर बाकीच्या 3 मॅच भारताने जिंकल्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हैदराबादच्या पिचवर पहिल्यांदाच मॅच होत आहे. हैदराबादच्या पिचवर शेवटची वन डे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2019 मध्ये झाली होती. ही मॅच भारताने 6 विकेट राखून जिंकली होती. हैदराबादच्या पिचवर झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये भारताच्या कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या होत्या आणि न्यूझीलंड विरोधात त्याचा टीममध्ये समावेश आहे.

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नाही तर युजवेंद्र चहल खांद्याच्या दुखापतीमुळे खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण रजत पाटीदारचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. ईशान किशनचा टीममध्ये विकेटकीपर आणि मधल्या फळीचा फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Virat Kohli: विराट भाऊ जोमात दिग्गज क्रिकेटर कोमात; जगातील टॉप खेळाडूंच्या यादीत पोहचला कोहली

Mumbai Marathon 2023 : 'या' खेळाडूने जिंकली मुंबई मॅरेथॉन

  1. भारत (Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, श्रीकर भरत , शाहबाज़ अहमद, रजत पाटीदार
  2. न्यूझीलंड (Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमेन , हेनरी शिपले
  3. भारत (Dream11 Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वाशिंगटन सुंदर, उमरान मलिक/शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव, मो. शमी, मो. सिराज
  4. न्यूझीलंड (Dream11 Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर / ब्रेसवेल, लॉकी फर्ग्यूसन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी