IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड आज रांचीत खेळणार पहिली टी 20

India vs New Zealand 1st T20I at JSCA International Stadium Complex Ranchi on 27th January 2023, Match Preview, Weather Report, Pitch Report, Team News, Dream 11 Team : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची टी 20 सीरिज आजपासून (शुक्रवार 27 जानेवारी 2023) पासून सुरू होत आहे. या सीरिजची पहिली मॅच रांचीतील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे.

IND vs NZ 1st T20I
भारत आणि न्यूझीलंड आज रांचीत खेळणार पहिली टी 20  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत आणि न्यूझीलंड आज रांचीत खेळणार पहिली टी 20
  • आजच्या मॅच दरम्यान पाऊस पडणार नाही
  • रांचीच्या या पिचवर आतापर्यंत फक्त 3 वेळा इंटरनॅशनल मॅच झाल्या, पिच बॉलिंगसाठी उत्तम

India vs New Zealand 1st T20I at JSCA International Stadium Complex Ranchi on 27th January 2023, Match Preview, Weather Report, Pitch Report, Team News, Dream 11 Team : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 मॅचची टी 20 सीरिज आजपासून (शुक्रवार 27 जानेवारी 2023) पासून सुरू होत आहे. या सीरिजची पहिली मॅच रांचीतील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून मॅचचे थेट प्रक्षेपण (Live Broadcast or Live Telecast) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर सुरू होईल. मॅच डीडी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर पण दाखवली जाईल. मॅचचे ऑनलाईन स्ट्रिमिंग (Live Streaming or Online Streaming) डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर दाखवले जाईल. मॅचचा टॉस संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.

भारताने न्यूझीलंड विरुद्धची वन डे सीरिज 3-0 अशी जिंकली आहे. याआधी भारताने श्रीलंकेविरुद्धची वन डे सीरिज 3-0 आणि टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. सध्या भारत आयसीसी वन डे टीम रँकिंगमध्ये 114 रेटिंगसह पहिल्या स्थानावर तर आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये 267 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमध्ये भारत 115 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करत असलेल्या टीम इंडियाकडून असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

Babar Azam Sexting Video Viral:हनी ट्रॅपमध्ये अडकला पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम

IND vs SL, Video  : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद' 

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली टी 20 : वेदर रिपोर्ट (India vs New Zealand 1st T20I, Weather Report)

आजच्या मॅच दरम्यान पाऊस पडणार नाही. यामुळे कोणत्याही व्यत्ययाविना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टी 20 मॅच सुरळीत पार पडेल असे चित्र आहे. रांचीचे कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 14 अंश से. असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली टी 20 : पीच रिपोर्ट (India vs New Zealand 1st T20I, Pitch Report)

रांचीच्या या पिचवर आतापर्यंत फक्त 3 वेळा इंटरनॅशनल मॅच झाल्या आहेत. हे पिच बॉलिंगसाठी उत्तम आहे. यामुळे टॉस मॅचच्या निर्णयावर परिणाम करण्याची शक्यता आहे.

  1. भारत (Team India) : शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जितेश शर्मा, मुकेश कुमार , पृथ्वी शॉ
  2. न्यूझीलंड (Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर (कॅप्टन), लॉकी फर्ग्यूसन, ईश सोढी, ब्लेयर टिकनर, जेकब डफी, माइकल रिपन, डेन क्लीवर, हेनरी शिपली, बेन लिस्टर
  3. भारत (Dream11 Team India) : शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव
  4. न्यूझीलंड (Dream11 Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर (कॅप्टन), लॉकी फर्ग्यूसन, ईश सोढी, ब्लेयर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी