IND vs NZ 3rd ODI : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी वन डे; Live स्कोअर

India vs New Zealand 3rd ODI on Tuesday 24 January 2023 at Holkar Cricket Stadium, Indore, live score : आज (मंगळवार 24 जानेवारी 2023)  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील तिसरी मॅच इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर...

IND vs NZ 3rd ODI, live score
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी वन डे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IND vs NZ 3rd ODI : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी वन डे
  • भारताने सीरिज आधीच 2-0 अशी जिंकली आहे
  • भारत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देणार की न्यूझीलंड व्हाईटवॉश टाळणार याकडे अनेकांचे लक्ष

India vs New Zealand 3rd ODI on Tuesday 24 January 2023 at Holkar Cricket Stadium, Indore, live score : आज (मंगळवार 24 जानेवारी 2023)  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वन डे मॅचच्या सीरिजमधील तिसरी मॅच इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मॅचचे थेट प्रक्षेपण (Live Broadcast or Live Telecast) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर सुरू होईल. मॅच डीडी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर पण दाखवली जाईल. मॅचचे ऑनलाईन स्ट्रिमिंग (Live Streaming or Online Streaming) डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर दाखवले जाईल. मॅचचा टॉस दुपारी 1 वाजता होणार आहे. । स्कोअरकार्ड

भारताने न्यूझीलंड विरुद्धची वन डे सीरिज आधीच 2-0 अशी जिंकली आहे. आता तिसरी मॅच जिंकून भारत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देणार की न्यूझीलंड तिसरी मॅच जिंकून व्हाईटवॉश टाळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. याआधी भारताने श्रीलंकेविरुद्धची टी 20 सीरिज 2-1 अशी तर वन डे सीरिज 3-0 अशी जिंकली. वन डे सीरिजनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 मॅचची टी 20 सीरिज होणार आहे. पहिली टी 20 मॅच शुक्रवार 27 जानेवारी 2023 रोजी रांची येथे आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी वन डे : वेदर रिपोर्ट (India vs New Zealand 3rd ODI, Weather Report)

आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही. तिसऱ्या वन डे मॅचमध्ये हवामानाचा कोणताही व्यत्यय येणार नाही. इंदूरमध्ये शेवटची वन डे पाच वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली होती. या मॅचमध्ये भारताने 290 धावांचा आरामात पाठलाग केला होता. यामुळे इंदूरमध्ये आधी बॅटिंग करणाऱ्या टीमचे टार्गेट 300 पेक्षा जास्त धावा करण्याचे असेल, अशी चिन्हं आहेत. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरी वन डे : पीच रिपोर्ट (India vs New Zealand 3rd ODI, Pitch Report)

इंदूरचे पीच बॅटरसाठी उत्तम आहे. या पीचवर फटकेबाजी करण्याची आणि धावांचा डोंगर उभारण्याची संधी मिळू शकते. यामुळे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्याचा विचार दोन्ही टीम करण्याची शक्यता आहे.

KL Rahul Athiya Shetty Wedding : केएल राहुल आणि अथिया शेट्टीने बांधली लगीनगाठ, खंडाळ्यात पार पडला विवाहसोहळा

IND vs SL, Video  : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद' 

Babar Azam Sexting Video Viral:हनी ट्रॅपमध्ये अडकला पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम

  1. भारत (Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, श्रीकर भरत, रजत पाटीदार , शाहबाझ अहमद, उमरान मलिक
  2. न्यूझीलंड (Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर, हेनरी शिपले, लॉकी फर्ग्यूसन, ब्लेयर टिकनर, मार्क चॅपमॅन, ईश सोढी, जेकब डफी , डग ब्रेसवेल
  3. भारत (Dream11 Team India) : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज
  4. न्यूझीलंड (Dream11 Team New Zealand) : फिन अॅलेन, डेवोन कॉनवे, हेनरी निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिशेल सेंटनर, हेनरी शिपले/डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्यूसन/जेकब डफी, ब्लेयर टिकनर

भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 वन डे मॅचची सीरिज

  1. बुधवार 18 जानेवारी 2023, पहिली वन डे : भारताचा 12 धावांनी विजय
  2. शनिवार 21 जानेवारी 2023, दुसरी वन डे : भारताचा 8 विकेट राखून विजय
  3. मंगळवार 24 जानेवारी 2023, तिसरी वन डे : निकाल जाहीर होईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी