India vs New Zealand 3rd T20I at Narendra Modi Stadium Ahmedabad on 1st February 2023, Match Preview, Weather Report, Pitch Report, Team News, Dream 11 Team : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी 20 मॅचच्या सीरिजची तिसरी आणि निर्णायक मॅच आज गुजरातमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून मॅचचे थेट प्रक्षेपण (Live Broadcast or Live Telecast) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर सुरू होईल. मॅच डीडी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनलवर पण दाखवली जाईल. मॅचचे ऑनलाईन स्ट्रिमिंग (Live Streaming or Online Streaming) डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर दाखवले जाईल. मॅचचा टॉस संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.
टी 20 सीरिजमध्ये न्यूझीलंडने पहिली मॅच 21 धावांनी तर भारताने दुसरी मॅच 6 विकेट राखून जिंकली. दोन्ही टीमनी प्रत्येकी 1 मॅच जिंकल्यामुळे आजची मॅच निर्णायक ठरणार आहे. ही मॅच जिंकणारी टीम टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकेल.
भारताने न्यूझीलंड विरुद्धची वन डे सीरिज 3-0 अशी जिंकली आहे. याआधी भारताने श्रीलंकेविरुद्धची वन डे सीरिज 3-0 आणि टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. आयसीसी रँकिंगनुसार टी 20 (भारताचे 267 रेटिंग) आणि वन डे (भारताचे 114 रेटिंग) या दोन्ही प्रकारांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारत (115 रेटिंग) दुसऱ्या क्रमांकावर आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करत असलेल्या टीम इंडियाकडून असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पावसाची शक्यता नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टी 20 मॅच पावसाच्या व्यत्ययाविना सुरळीत पार पडेल.
मोदी स्टेडियमचे पिच स्पिनर्ससाठी अनुकूल असेल. पण आधी धावांचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. मॅचच्या दुसऱ्या डावात स्पिनर्सना जास्त संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Babar Azam Sexting Video Viral:हनी ट्रॅपमध्ये अडकला पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम
IND vs SL, Video : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद'