IND vs NZ 5th T20I: जाणून घ्या कधी आणि कुठे बघता येईल 5वा T20I

India vs New Zealand 5th T20I: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 सीरिजचा पाचवा आणि अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. जाणून घेऊया हा शेवटचा सामना  तुम्ही कुठे आणि कहा बघू शकाल. 

Virat
IND vs NZ 5th T20I: जाणून घ्या कधी आणि कुठे बघता येईल 5वा T20I  |  फोटो सौजन्य: AP

मुंबईः  आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात T20 सीरिजचा पाचवा आणि अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया न्यूझीलंडला क्लीन स्विप देण्यासाठी मैदानात उतरेल. पाच सामन्याच्या सीरिजमध्ये 4-0 अशी आघाडी टीम इंडियानं घेतली आहे. आता त्यांचं लक्ष्य हे क्लीन स्वीपवर असेल. तर न्यूझीलंडची टीम सुद्धा मैदानात एका दवाबाखालीच मैदानात उतरेल. जाणून घेऊय़ा या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. 

कधी आणि कुठे बघाल भारत- न्यूझीलंड पाचवा T20 सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाचवा आणि शेवटचा T20 सामना रविवारी ( 2 फेब्रुवारी 2020) ला टॉरांगाच्या माऊंट मोंगानुईमध्ये खेळला जाईल. 

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पाचवा T20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सुरू होईल.

कुठे बघाल पाचवा T20 सामना?

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात T20 सीरिजचा पाचवा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्रजी आणि हिंदी कमेंट्रीसोबत बघू शकता.

पाचवा T20 चं मैदान कसं आहे?

आजचा सामना किवी कर्णधार केन विल्यमसनचा होमग्राउंड, टॉरंगा (माउंट मोंगनुई) येथे खेळला जाणार आहे. विल्यमसन दुखापतग्रस्त आहे परंतु त्याची टीम येथे पर्वतरांगामध्ये बांधलेल्या सुंदर स्टेडियममध्ये उपस्थित असेल. येथे हवा खूप असते अशातच बॉलर्संना याचा फायदा होईलच पण रनच्या वेळी त्यांना तितकाच संघर्ष करावा लागेल. मैदानाबद्दल बोलायचं झालं तर बरेच धावा अपेक्षित आहेत.

हवामान कसे असेल?

हवामानाबद्दल बोलायचं झाल्यास तर दिवसा तापमान 28 डिग्री सेंटीग्रेड आणि संध्याकाळ आणि रात्री 18 अंश सेंटीग्रेड राहील. याशिवाय आकाशही ढगाळ असेल पण पावसाशी संबंधित कोणताही अंदाज नाही. 

मोठी गोष्ट

या मैदानात पहिल्या खेळीतील T20चा स्कोर सरासरी 199 आहे. येथे झालेल्या पाच T20 सामन्यात पहिली बॅटिंग करणारी टीम विजयी होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...