मुंबई: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यातील मालिकेतील पहिला टी20 सामना(T20 match) शुक्रवारी एकही बॉल न खेळता रद्द करण्यात आला. यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. वेलिंग्टनमध्ये सामना सुरू होण्याआधी जबरदस्त पाऊस कोसळत होता आणि इंद्रदेव शेवटपर्यंत क्रिकेट चाहत्यांवर काही दयाळू झाले नाहीत. अखेर सामना अधिकाऱ्यांना सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. india vs new zealand first T20 match cancel due to rain
अधिक वाचा - भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामना लाइव्ह स्ट्रिमिंग
हा सामना भारतीय वेळेनुसार 12 वाजता सुरू होणार होता. न्यूझीलंडच्या वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता टॉस होणार होता. मात्र पाऊस शेवटपर्यंत थांबलाच नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली. त्यानंतर पिच झाकण्यात आली. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्याने पाणी लवकर काढले जाते. मात्र पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. अखेर सामना रद्द करण्यात आला. यातच खेळाडूंनी व्हॉलिबॉलच्या माध्यमातून स्टेडियममध्ये आनंद घेतला.
जेव्हा पाऊस कोसळत होता आणि सामना थांबला होता तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी स्टँड्समध्ये आपल्या चाहत्यांची भेट घेतली आणि सेल्फीही क्लिक केले.
आता दोन्ही संघ माऊंट माऊंगानुईसाठी रवाना होतील येथे 20 नोव्हेंबरला मालिकेतील दुसरा सामना बे ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. आशा आहे की रविवारी होणाऱ्या सामन्यादरम्यान माऊंट माऊंगानुईमध्ये चांगले वातावरण बघायला मिळेल आणि क्रिकेट चाहते सामन्याचा आनंद घेऊ शकतील.
टी20 मालिका सुरू होण्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार यांनी हातात ट्रॉफी घेऊन फोटोज क्लिक केले. दरम्यान, ट्रॉफीची साईज बघून अनेक चाहत्यांनी याची खिल्ली उडवली.
अधिक वाचा - आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात
18 नोव्हेंबर पहिली T20, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर दुसरी T20, माउंट मौनगानुई
22 नोव्हेंबर तिसरी T20, ऑकलंड
वनडे मालिका
25 नोव्हेंबर पहिली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर दुसरी वनडे हॅमिल्टन
30 नोव्हेंबर तिसरी वने, क्राइस्टचर्च