IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्या या प्लेईंग XI सोबत उतरू शकतो

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 16, 2022 | 14:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs New Zealand:टीम इंडिया 18 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील पहिला टी20 सामना वेलिंग्टनमध्ये खेळवला जाणार आहे. संघाचे नेतृत्व ऑलराऊंडर हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. 

hardik pandya
न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक या प्लेईंग XI सोबत उतरू शकतो 
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेची विजयी सुरूवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
  • सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि इशान किशनला उतरवले जाऊ शकते.
  • टी20 वर्ल्ड कप-2022मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता त्याला आता आराम देण्यात आला आहे.

मुंबई: भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यातील मालिकेतील पहिला टी20 सामना(firstt20 match) 18 नोव्हेंबरला खेळवला जाईल. या सामन्यांसाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाचे(team india) नेतृत्व हार्दिक पांड्या(hardik pandya) सांभाळत आहेत. याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने(gujrat titans) आपल्या पहिल्याच हंगामातील पहिला खिताब जिंकला होता. पहिल्या टी20 साठी प्लेईंग 11वर साऱ्यांच्या नजरा असतील. india vs new zealand: hardik pandya will play with this playing 11

अधिक वाचा - एकापाठोपाठ तीन मुख्यमंत्री का बदलले : कन्हैया कुमार

टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांचा पराभव

भारतीय संघाला टी20 वर्ल्ड कप टी20 वर्ल्ड कप-2022च्या सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यांना इंग्लंडने मात दिली होती. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला हरवत खिताब जिंकला होता. तर न्यूझीलंडचा प्रवासही सेमीफायनलमध्ये संपला होता. न्यूझीलंडला बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तानने हरवले होते.  टी20 वर्ल्ड कप-2022मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत होता त्याला आता आराम देण्यात आला आहे.

 

हार्दिक या खेळाडूंना देऊ शकते संधी

हार्दिक पांड्या मालिकेतील पहिला सामना जिंकत मालिकेची विजयी सुरूवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि इशान किशनला उतरवले जाऊ शकते. गिल यासोबतच टी20मध्ये पदार्पण करू शकतो. तर तिसऱ्या स्थानावर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव, ऋषभ पंतला संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्या शक्य असल्यास खालच्या क्रमांकावर उतरेल. संघात दोन स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहलला दिली जाईल. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराजला प्लेईंग 11मध्ये उतरवले जाऊ शकते. 

टीम इंडियाचे संभाव्य प्लेईंग 11 - शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद सिराज.

भारत वि न्यूझीलंड वेळापत्रक

18 नोव्हेंबर पहिली T20, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर दुसरी T20, माउंट मौनगानुई
22 नोव्हेंबर तिसरी T20, ऑकलंड

वनडे मालिका

25 नोव्हेंबर पहिली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर दुसरी वनडे एकदिवसीय, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर तिसरी वने, क्राइस्टचर्च

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी