IND vs NZ, World Cup 2019: कशी असेल न्यूझीलंडविरुद्ध भारताची ११ जणांची टीम?

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 13, 2019 | 13:18 IST | टाइम्स नाऊ हिंदी

India vs New Zealand: शिखर धवन जखमी झाल्यामुळं केएल राहुल सलामीला येणार हे निश्चित झालं असलं तरी, चौथ्या क्रमांकावर मैदानात कोणता खेळाडू उतरणार? आणि बॉलिंग अटॅकमध्ये काही बदल होणार का? याची उत्सुकता आहे.

Team India
न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक शक्य   |  फोटो सौजन्य: AP

लंडन: आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत आज आपली तिसरी मॅच न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे. नॉटिंगहममध्ये होत असलेल्या या मॅचवर पावसाचं सावट असलं तरी, भारतीयांचा उत्साह कायम आहे. मॅचची सगळी तिकिटं विकली गेली आहेत. आजची मॅच जिंकून भारत वर्ल्डकपमध्ये विजयाची हॅटट्रीक करून, आपली दावेदारी आणखी बळकट करण्याच्या तयारीत आहे. परंतु, वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवणं तितकं सोपं नाही हे विराट कोहली आणि त्याच्या टीमच्याही लक्षात आलं असले. त्यामुळं पहिल्या दोन मॅच जिंकल्या असल्या तरी, या मॅचसाठी वेगळी रणनिती घेऊनच विराट कोहलीची टीम मैदानात उतरणार आहे.

डावखुरा सलामीवर शिखर धवन जखमी झाल्यामुळं केएल राहुल सलामीला येणार हे निश्चित झालं असलं तरी, चौथ्या क्रमांकावर मैदानात कोण उतरणार? आणि बोलिंग अटॅकमध्ये काही बदल होणार का? याची उत्सुकता आहे. शिखर धवनच्या जखमी होण्यामुळे निश्चित टीम इंडियाच्या अंतिम ११ जणांमध्ये बदल होणार आहेत. केएल राहुलला त्याच्या आवडीप्रमाणं ओपनिंगची संधी मिळणार आहे. पण, त्यामुळं चौथ्या क्रमांकावरच्या बॅट्समनचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

दिनेश कार्तिकला संधी शक्य

केएल राहुलनं रोहित शर्माच्या बरोबरीनं टी-२०मध्ये टीम इंडियाला ओपनिंग करून दिली आहे. त्यामुळं सलामीची चिंता जाणवणार नाही. पण, चौथ्या क्रमांकाविषयी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्या क्रमांकवर दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल, हे बघावे लागणार आहे. त्यातही न्यूझीलंडच्या वेगवान बोलिंगचा इंग्लंडमध्ये सामना करण्यासाठी अनुभवाची गरज आहे. त्यात दिनेश कार्तिकचे पारडे जड असणार आहे. विजय शंकरला सराव सामन्यात बांग्लादेश विरुद्ध संधी मिळाली होती. पण, त्यात तो रन्स करण्यात अपयशी ठरला. त्यामुळं त्याच्या जागी दिनेश कार्तिकची वर्णी लागू शकते. विजय शंकरच्या रुपाने एक मीडियम पेसर टीममध्ये येत असला तरी, न्यूझीलंड विरुद्धची महत्त्वाची मॅच असल्याने विजय शंकरला घेऊन कोणताही प्रयोग करण्याचा धोका विराट कोहली घेण्याची शक्यता कमी आहे.

शमी टीममध्ये असणार? 

पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण आणि मैदानातील स्थिती पाहिली तर, विराट कोहली आणि एका फास्ट बॉलरला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. त्यात पहिल्या दोन मॅचमध्ये अपेक्षित प्रभाव न टाकू शकलेल्या कुलदीप यादवला बाहेर ठेवून मोहम्मद शमीला ११ जणांच्या टीममध्ये सहभागी करून घेण्याची शक्यता वाटत आहे. शमीला या मॅचच्या माध्यमातनं पहिल्यांदाच मैदानात उतरण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात शमीने चांगली कामगिरी केली होती. ही बाब त्याच्यासाठी चांगली ठरणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध भारताची संभाव्य टीम : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
IND vs NZ, World Cup 2019: कशी असेल न्यूझीलंडविरुद्ध भारताची ११ जणांची टीम? Description: India vs New Zealand: शिखर धवन जखमी झाल्यामुळं केएल राहुल सलामीला येणार हे निश्चित झालं असलं तरी, चौथ्या क्रमांकावर मैदानात कोणता खेळाडू उतरणार? आणि बॉलिंग अटॅकमध्ये काही बदल होणार का? याची उत्सुकता आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola