IND vs NZ Playing 11, 2nd T20I: दोन्ही संघ या खेळाडूंना देऊ शकतात संधी, हर्षल की आवेश करणार डेब्यू?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 19, 2021 | 13:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

India (IND) vs New Zealand (NZ) 2nd T20I Playing 11 Today Match, Dream11 Team Prediction:आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. पाहा कोणत्या प्लेईंग ११ ला दोन्ही संघ संधी देऊ शकतात. 

rohit sharma
दोन्ही संघ या खेळाडूंना देऊ शकतात, हर्षल,आवेश करणार डेब्यू 
थोडं पण कामाचं
  • भारत वि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना आज
  • रांचीच्या मैदानावर रंगणार दुसरा टी-२० सामना
  • या ११ खेळाडूंसह उतरणार टीम इंडिया आणि न्यूझीलंड

India (IND) vs New Zealand (NZ) 2nd T20I Playing 11 Today Match, Dream11 Team Prediction:  भारत(india) आणि न्यूझीलंड(new zealand) यांच्यात रांचीच्या(ranchi) मैदानावर आज दुसरा टी-२० सामना(second t-20 match) खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने जयपूरच्या मैदानावर पहिल्या टी-२० सामन्यात जबरदस्त कामगिरी करत ५ विकेटनी विजय मिळवला होता. आज रांचीच्या मैदानावरील सामना जिंकत टीम इंडिया(team india) ही मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड संघाला विजयाचा सूर गवसलेला नसून ते या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरीचा प्रयत्न करतील. भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊदी करत आहे. India vs new zealand second t20 Dream11 Team Prediction of playing 11

हर्षल-आवेशला मिळणार पदार्पणाची संधी

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जरी विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. मोहम्मद सिराज आणि दीपक चाहर. सिराजने पहिल्या टी-२०मध्ये ४ ओव्हरमध्ये ३९ धावा देत केवळ एक विकेट मिळवला. तर दीपक चाहरने ४ ओव्हरमध्ये ४२ धावा देत एक विकेट मिळवला. हे दोघेही खेळाडू महागडे ठरले. अशातच दीपक चाहर अथवा मोहम्मद सिराजला बाहेर बसवत हर्षल पटेल की आवेश खान या दोघांपैकी कोणाला पदार्पणाची संधी मिळणार हे पाहावे लागेल. 

युझवेंद्र चहलचे पुनरागमन

भारतीय टीमच्या प्लेईंग ११मध्ये आणखी एक बदल अपेक्षित आहे. युझवेंद्र चहलला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्षऱ पटेलने पहिल्या टी-२० सामन्यात ४ ओव्हरमध्ये ३१ धावा दिल्या हो्त्या. मात्र एकही विकेट मिळवता आला नव्हता. त्यामुळे चहलला दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

ईश सोढीचे पुनरागमन

तर न्यूझीलंडचा संघ विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. यासाठी आपल्या प्लेईंग ११मध्ये ईश सोढीचे पुनरागमन होऊ शकते. सोढीने टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये दमदार कामगिरी केली होती आणि त्याला टोड अॅस्टलच्या जागी संधी मिळू शकते. 

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेईंग ११

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, रविचंद्रन अश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार आणि आवेश खान. 

न्यूझीलंड - मार्टिन गप्टिल, डैरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्‍लेन फिलिप्‍स, टिम सीफर्ट, जेम्‍स नीशम, मिचेल सैंटनर, टिम साउथी (कर्णधार), ट्रेंट बोल्‍ट, लोकी फर्ग्‍यूसन आणि ईश सोढी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी