मुंबईः भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी

india vs new zealand second test match 25 percent viewers allowed inside the stadium भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईत शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होईल. या कसोटीसाठी फक्त २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना बघण्याची परवानगी मिळाली आहे. 

india vs new zealand second test match 25 percent viewers allowed inside the stadium
मुंबईः भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी 
थोडं पण कामाचं
  • मुंबईः भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीसाठी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची आसन क्षमता ३० हजार
  • मुंबईतील कसोटी सामन्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे

india vs new zealand second test match 25 percent viewers allowed inside the stadium मुंबईः भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईत शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होईल. या कसोटीसाठी फक्त २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना बघण्याची परवानगी मिळाली आहे. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची आसन क्षमता ३० हजार एवढी आहे. पण २५ टक्के तिकिटांचीच विक्री होणार असल्यामुळे दहा हजारांपेक्षा कमी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना बघण्याची संधी मिळेल.

जगातील निवडक देशांमध्ये ओम्रिकॉन' (तांत्रिक नाव - VOC B.1.1529) नावाचा कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाला आहे. हा विषाणू सर्वाधिक वेगाने मानवी शरीर आजाराने बाधीत करतो. या विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू शकतो. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक कोरोना प्रतिबंक लस या विषाणूला प्रतिबंध करण्यात अपयशी ठरत असल्याचे आढळले आहे. अद्याप भारतात हा विषाणू आढळलेला नाही. भारतीय कोरोना प्रतिबंधक लसचा 'ओम्रिकॉन'ला प्रतिबंध करण्यासाठी उपयोग होतो की नाही हे अद्याप जाहीर झालेले नाही. तज्ज्ञ आवश्यक त्या तपासण्या करत आहेत. यामुळे मुंबईतील कसोटी सामन्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.

याआधी भारताचा न्यूझीलंड दौरा सुरू असताना कोरोना संकटाची तीव्रता वाढू लागली. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागले. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. यामुळे भारताला मार्च २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यानंतर काही महिने सर्व प्रकारचे क्रिकेट स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही बाब लक्षात ठेवून कोरोनामुळे पुन्हा क्रिकेट स्थगित होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन मात्र वानखेडे स्टेडियमवरील कसोटीसाठी किमान ५० टक्के तिकिटांच्या विक्रीची परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. वानखेडे स्टेडियमवर शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये झाला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत डिसेंबर २०१६ मध्ये शेवटचा कसोटी सामना झाला होता. यानंतर थेट डिसेंबर २०२१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामन्याच्या निमित्ताने क्रिकेट पुन्हा खेळवले जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी