[VIDEO] MS Dhoni: धोनी आऊट झाल्याच्या धक्क्यातून भारतीय सावरलेले नाहीत!

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 12, 2019 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी त्याच्या दुसऱ्या वर्ल्ड कप विजयापासून काही इंच दूर राहीला. मार्टिन गुप्टिलच्या डायरेक्ट थ्रोनं धोनीच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. रन आऊट झाल्यानंतर धोनी खूपच निराश दिसत होता.

MS Dhoni
महेंद्रसिंग धोनीचं वर्ल्ड कप स्वप्न धुळीस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महेंद्रसिंह धोनीचे चाहते अजूनही धक्क्यात
  • आऊट झाल्यानंतर धोनीला भावना अनावर
  • धोनीचं पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीस

नवी दिल्ली :  आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत सेमीफायनलमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या रंगतदार सामन्यात भारत कमी पडला आणि टीमला गाशा गुंडाळावा लागला. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला असून, आता इंग्लंड आणि न्यूझीलंड अशी फायनल होणार आहे. या दोन्ही टीमनी एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळं क्रिकेटला या वेळी नवा वर्ल्ड कप विजेता मिळणार आहे. दुसरीकडं टीम इंडियातील काही खेळाडूंच्या भवितव्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात महेंद्रसिंग धोनीचाही समावेश आहे. धोनी त्याच्या दुसऱ्या वर्ल्ड कप विजयापासून काही इंच दूर राहिला. मार्टिन गुप्टिलच्या डायरेक्ट थ्रोनं धोनीच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. रन आऊट झाल्यानंतर धोनी खूपच निराश दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तो व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी हळहळत आहे.

धोनीला भावना अनावर

टीम इंडिया धक्कादायकपणे वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. त्याला दोन दिवस उलटून गेले तरी, भारतीय क्रिकेटप्रेमी त्या धक्क्यातून बाहेर पडलेले नाहीत. सोशल मीडियावर आजही या पराभवाची आणि भारतीय क्रिकेट टीमनं वर्ल्ड कपमध्ये केलेल्या परफॉर्मन्सची चर्चा सुरू आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होणार असल्यानं त्याला निवृत्तीची भेट म्हणून वर्ल्ड कप देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या आशांवर पाणी फिरलं आहे. क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर कोणत्याही आव्हानासमोर उभा राहणारा खेळाडू म्हणून धोनीला ओळखलं जातं. पण, न्यूझीलंड विरूद्ध रन-आऊट झाल्यानंतर तोही निराश झाला. टेन्शन असो किंवा राग असो, आपल्या भावना चेहऱ्यावर न आणणारा धोनी त्या दिवशी आपल्या भावनांना आवर घालू शकला नाही. त्याचा चेहरा १३० कोटी भारतीयांच्या भावना व्यक्त करत होता. धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  

 

 

दुःखाचा महापूर ओसरला नाही

धोनीने सातव्या विकेटसाठी रवींद्र जडेजाच्या सोबतीने ११६ रन्सची पार्टनरशीप केली होती. पण, तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. जडेजा आणि धोनीने एक वेगळ्याच प्रकारचं क्रिकेट खेळून सामन्याचा रंगच बदलला होता. सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत असताना या दोघांनी अतिशय संयमाने आणि तेवढ्याच आक्रमकतेनं टीमला विजयाच्या जवळ आणून ठेवले होते. पण, धोनी रन-आऊट झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनीला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. त्यादिवशी धोनीचा एकही फॅन रडला नसेल तर नवल. सोशल मीडियावर तर दुःखाचा महापूरच आला होता. त्या महापूरचं पाणी अजून ओसरलेलं नाही. वर्ल्ड कपच्या सुरूवातीपासूनच धोनी आता निवृत्त होणार अशी चर्चा सुरू होती. आता गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] MS Dhoni: धोनी आऊट झाल्याच्या धक्क्यातून भारतीय सावरलेले नाहीत! Description: MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी त्याच्या दुसऱ्या वर्ल्ड कप विजयापासून काही इंच दूर राहीला. मार्टिन गुप्टिलच्या डायरेक्ट थ्रोनं धोनीच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. रन आऊट झाल्यानंतर धोनी खूपच निराश दिसत होता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola