झाला खुलासा, सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा कोणी दिला होता सल्ला

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 12, 2019 | 20:24 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली जात आहे. यातच खुलासा झाला आहे की हा निर्णय कोणी घेतला

ms dhoni
महेंद्रसिंग धोनी 

थोडं पण कामाचं

  • न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव
  • धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्यावरून वाद
  • बांगर यांच्या सल्ल्यानंतर घेतला निर्णय 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकपमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये १८ धावांनी पराभव सहन करावा लागला. यासोबतच विराट ब्रिगेडचे यंदाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडची धावसंख्या २३९ धावांवर रोखली होती. हे आव्हान खरंतर टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी फार मोठे नव्हते. मात्र भारतीय संघाच्या पहिल्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी ७व्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी भारताला जिंकवण्यासाठी पुरेशी ठरली नाही. जडेजा कॅच आऊट झाला आणि त्यानंतर धोनी रनआऊट झाला आणि भारताच्या जिंकण्याच्या आशा मावळल्या.

संघाच्या पराभवानंतर क्रिकेट समीक्षकांनी धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याच्या टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. प्रत्येकाने म्हटलेय की कठीण परिस्थिती धोनीला पंत आणि पांड्याच्या आधी फलंदाजीस पाठवल्यास योग्य होते मात्र टीम मॅनेजमेंटने त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. या निर्णयावरून सातत्याने सवाल उपस्थित झाल्यानंतर याचा खुलासा झाला आहे. कोणाच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला याचा खुलासा झाला आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार बॅटिंग कोच संजय बांगर यांच्या सल्ल्यानंतर धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते.

सीओए टीम इंडियाचे कोच आणि कर्णधार एकत्र मिळून सेमीफायनलमधील संघाला मिळालेल्या पराभवाबाबत समीक्षा करणार आहेत. यातच बांगर यांच्या सल्ल्यानंतर धोनीच्या फलंदाजीच्या क्रमावरून वाद रंगू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सीओए यांना जाणून घ्यायचे आहे की मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बांगर यांच्या सल्ल्यावर वीटो का नाही केला. 

सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीच्या जोरावर धोनीला पाचव्य क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात आले होते. मात्र इतक्या महत्त्वाच्या सामन्यात काय विचार करून त्याची बॅटिंग पोझिशन बदलण्यात आली. या सामन्यात भारताने अवघ्या ५ धावांत रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल हे तीन फलंदाज गमावले होते. मात्र त्यानंतर चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत आणि पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आळा. या दोन्ही फलंदाजांनंतर धोनीला संधी देण्यात आली. त्याने रवींद्र जडेजासोबत ११६ धावांची भागीदारी करत भारताला मानहानीकारक पराभवापासून वाचवले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
झाला खुलासा, सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा कोणी दिला होता सल्ला Description: टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली जात आहे. यातच खुलासा झाला आहे की हा निर्णय कोणी घेतला
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola