खूप छान! श्रेयस अय्यरची मोठी कामगिरी, मिळवलं चौथं स्थान

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरनं न्यूझीलंड विरूद्धच्या वनडेत करिअरमधलं पहिलं शतक केलं. यावेळी त्यानं 11 फोर आणि 1 सिक्स मारला आहे.

Shreyas Iyer
खूप छान! श्रेयस अय्यरची मोठी कामगिरी, मिळवलं चौथं स्थान  

हेमिल्टनः टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन श्रेयस अय्यरनं बुधवारी न्यूझीलंडविरूद्धचा आपल्या वनडे करिअरमधला पहिलं शतक केलं आहे. हेमिल्टनमध्ये खेळत असलेल्या पहिल्या वनडेमध्ये अय्यरनं 107 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं. मुंबईचा डावखुरा बॅट्समनला पहिल्या वनडेत शतक करण्यासाठई 16 सामन्यांची वाट पाहावी लागली होती. यादरम्यान अय्यरनं सात अर्धशतकीय खेळी केली आणि त्याचा सर्वोच्च स्कोर 88 रनचा होता. जो 2017 मध्ये श्रीलंकाविरूद्ध दुसऱ्या वनडेत केला होता. 

श्रेयस अय्यरनं आपलं पहिलं वनडे शतक 101 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यानं आज टीम इंडियाचा डाव सावरला. कॅप्टन विराट कोहली (51) आणि केएल राहुलसोबत तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी क्रमशः 102 आणि 136 रनची भागेदारी केली. अय्यरनं खेळीत 43 व्या ओव्हरमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या खेळीदरम्यान 11 फोर आणि 1 सिक्स लगावला. कॅप्टन कोहलीसहित पूर्ण भारतीय टीमनं ड्रेसिंग रूममध्ये टाळ्या वाजवून युवा बॅट्समनचा उत्साह वाढवला. 

श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या सोडविली. डावखुरा बॅट्समननं चौथ्या क्रमांकावर येऊन शतक केलं. ज्या क्रमांकावरून टीम इंडिया गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत आहे. टीम इंडियाला वनडेत नंबर-4 उपयुक्त बॅट्समन मिळत नव्हता. अय्यरनं सुरूवातीपासून या क्रमांकावर खूप प्रभावित केलं आणि कित्येक प्रसंगी त्याने अर्धशतक ठोकून आपली उपयुक्तता सिद्ध केली. आता त्यानं शतक केल्यानं या क्रमावर त्यानं आपल्या नावाचा शिक्का मारला आहे.  

2015 नंतर चौथा बॅट्समन 

श्रेयस अय्यर हा भारतीय टीमसाठी 2015 नंतर नंबर 4 वर शतक जमावणारा चौथा बॅट्समन ठरला आहे. याआधी मनीष पांडेनं 2016 मध्ये सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतक केलं होतं. 2017 मध्ये युवराज सिंहनं इंग्लंडविरूद्ध कटकमध्ये चौथ्या नंबरवर शतक केलं होतं. 2018 मध्ये अंबाती रायुडूनं मुंबईत वेस्ट इंडिजविरूद्ध चौथ्या क्रमांकावरून येऊन शतक केलं. 2019 मध्ये चौथ्या नंबरवर बॅटिंग करणारा कोणताही बॅट्समन शतक पूर्ण करू शकला नव्हता. आता श्रेयस अय्यरनं ते करून दाखवलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...