भारत आणि न्यूझीलंड संघाची लढत; जाणून घ्या कधी होईल वनडे आणि टी-20 सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग, कधीपासून सुरू होणार सामने

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात प्राइम व्हिडिओवर होईल. म्हणजेच ज्यांनी प्राइम व्हिडिओचे सदस्यत्व घेतले आहे, तेच लोक या मालिकेचा आनंद घेऊ शकतील.  

Know when the India and New Zealand will come face to face
जाणून घ्या कधी आमने-सामने येतील भारत आणि न्यूझीलंड संघ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हार्दिक पांड्या टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
  • संघातील पहिला T20सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे.
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 110 सामने खेळले गेले आहेत,

New Zealand vs India: भारतीय क्रिकेट संघ Indian (Cricket Team)आता न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर असून न्यूझीलंडच्या संघासोबत  3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचा( India and New Zealand) संघ आप-आपली ताकद दाखवणार आहेत. या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दोन्ही संघाची ताकद हे एकसमान असून टी-20विश्वचषकात दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते, मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  (India vs New Zealand Team Match; Know when live streaming of ODI and T20 matches will happen, when matches will start)

अधिक वाचा  : 

दरम्यान या संघातील पहिला T20सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. आता दोन्ही संघांना T20विश्वचषकातील पराभवाच्या कटू आठवणी मागे टाकून पुढे जावे लागेल. कारण  टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला होता, तर दुसरीकडे न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता आगामी मालिका जिंकून दोन्ही संघांना सकारात्मक सुरुवात करत आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे.  दरम्यान या मालिकेसाठी दोन्ही संघांनी संघ जाहीर केला आहे.

अधिक वाचा  : गाझियाबादमध्ये ATM सेंटरवर भेटू शकतात बोगस बँकर

दोन्ही संघ आहेत मजबूत 

एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 110 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने 49 आणि भारताने 55 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत आहे, तर 5 सामने निकालाशिवाय राहिले आहेत. त्याचबरोबर, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये 20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने 9 तर किवी संघाने 9 जिंकले आहेत.  तर दोन सामन्यांचे निकाल लागलेच नाहीत. 

न्यूझीलंड T20 संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

अधिक वाचा  :  ठाकरे गटाला खिंडार पडत चाललंय : गिरीश

न्यूझीलंड एकदिवसीय संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अ‍ॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.

भारतीय T20संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंह, हरदीप सिंह, अरविंद यादव. पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

भारत एकदिवसीय संघ

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, युजवेंद्र चहल सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

भारताचा न्यूझीलंड दौरा, कधी आणि कुठे होणार सामना 

18 नोव्हेंबर 1ला T20, वेलिंग्टन
20 नोव्हेंबर 2रा T20, माउंट मौनगानुई
22 नोव्हेंबर 3रा T20, ऑकलंड

अधिक वाचा  :'Murder'च्या आधी सायको किलर करतात 'ही' भयंकर कृत्य!

एक दिवसीय मालिका

25 नोव्हेंबर 1ली वनडे, ऑकलंड
27 नोव्हेंबर 2रा एकदिवसीय, हॅमिल्टन
30 नोव्हेंबर 3रा वनडे, क्राइस्टचर्च

 सामन्याचे थेट प्रक्षेपण कसे पाहणार 

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात प्राइम व्हिडिओवर होईल. म्हणजेच ज्यांनी प्राइम व्हिडिओचे सदस्यत्व घेतले आहे, तेच लोक या मालिकेचा आनंद घेऊ शकतील.  

भारतात टीव्हीवर  नाही होणार थेट प्रक्षेपण 

न्यूझीलंड-भारत T20आणि एकदिवसीय मालिका टीव्हीवर नव्हे तर OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर थेट प्रवाहित केली जाईल.

न्यूझीलंड विरुद्ध भारत थेट सामन्याची वेळ

भारताच्या वेळेनुसार, 3 टी-20 सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग दुपारी 12 वाजल्यापासून असेल, तर एकदिवसीय सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी