IND vs PAK: नशीब असावे तर या खेळाडूसारखे, जानेवारीमध्ये झाले पदार्पण आणि आज खेळतोय वर्ल्डकप

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 16, 2019 | 16:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामन्यात असा एक खेळाडू खेळत आहे ज्याचे नशीब असे पालटले की याची त्याने कल्पनाही केली नसेल. तो वर्ल्डकपमध्ये खेळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.

team india
टीम इंडिया  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना खेळवला जात आहे. या सामन्यात असा एक क्रिकेटर आहे ज्याच्या नशीबाने अशी पलटी मारली की त्याने स्वत:ही विचार केला नसेल की तो वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध डेब्यू करेल. खरंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा दुखापतग्रस्त क्रिकेटर शिखर धवनच्या ऐवजी विजय शंकरला संघात सामाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहोत. 

विजय शंकरला निदहास ट्रॉफीनंतर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्याने स्वत: विचारही केला नसेल की तो पुन्हा टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल मात्र निदहास ट्रॉफीनंतर त्याने अशा अंदाजामध्ये पुनरागमन केले की त्याला वर्ल्डकप संघात स्थान मिळवले. आज तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वर्ल्डकपमध्ये डेब्यू करत आहे. 

दोन इंटरेस्टिंग गोष्टी

पहिल्यांदा वर्ल्डकपमध्ये एखाद्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये कोणताही डावखुरा फलंदाज नाही. विजयने आपल्या छोट्याच्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये मोठा प्रवास केला आहे. शंकरला पाकिस्तानविरुद्धच्या संघात दिनेश कार्तिकच्या आधी स्थान देण्यात आले आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये शंकर फ्लॉप ठरला होता त्या सामन्यात कार्तिकच्या जबरदस्त खेळीमुळे भारताला विजय साकारला आला होता. या सामन्यात शंकरने १९ चेंडूत १७ धावांची खेळी केली होती. यामुळे भारत पराभवाच्या मार्गावर होता. मात्र कार्तिकने ८ चेंडूत २९ धावांची जबरदस्त खेळी करत भारताला पराभवापासून वाचवले होते. 

बदलले आयुष्य

तेव्हापासून आतापर्यंत विजय शंकरच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. त्याला इंग्लंडमध्ये वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली आहे. शंकरच्या छोट्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास तो भारतासाठी आतापर्यंत ९ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी