IND vs Pak T20 Live Streaming, India vs Pakistan Asia Cup 2022 Live Cricket Score Streaming Online : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान ही टी २० मॅच कुठे आणि कशी LIVE बघता येणार ते जाणून घेऊ.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये सर्वात शेवटी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. ही मॅच २४ ऑक्टोबर २०२१ रोजी झाली होती. ही मॅच पाकिस्तानने दहा विकेट राखून जिंकली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ टी २० मॅच झाल्या आहेत. यापैकी सात मॅच भारताने आणि २ मॅच पाकिस्तानने जिंकल्या आहेत.
भारताचे नेतृत्व रोहित शर्मा तर पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करत आहे. ही बहुप्रतिक्षित मॅच दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मॅचसाठीचा अंतिम संघ दोन्ही देशांकडून मॅचचा आधी जाहीर केला जाईल. पण अंतिम संघाची निवड कोणत्या खेळाडूंमधून होणार हे निश्चित आहे.
भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, आवेश खान, दीपक हुडा, युझवेंद्र चहल
पाकिस्तान : बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर झमन, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, आसिफ अली, मोहम्मद हसनैन
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पीच बॅट्समनसाठी फायदेशीर ठरते. या मॅचमध्येही असंच पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या स्टेडियमवर सरासरी १५० रन्सचा स्कोर आहे आणि टॉस जिंकणारा कॅप्टन हा आधी बॉलिंग करण्यास प्राधान्य देतो. फास्ट बॉलर्ससाठीही पीचवरुन चांगला बाऊन्स मिळण्याची अपेक्षा असते. सुरुवातीला ओलावा सुकल्याने दुसऱ्या इनिंगच्या बॅट्समनला त्याचा अधिक फायदा होतो. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान हवामान चांगले राहण्याची अपेक्षा आहे. मॅचच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत काल (शनिवा २७ ऑगस्ट २०२२) शुभारंभाच्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांची टक्कर झाली. ही मॅच अफगाणिस्तानने आठ विकेट राखून जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने १९.४ षटकामध्ये १०५ धावा केल्या. अफगाणिस्तानने लंकेचा पूर्ण संघ गारद केला. यानंतर अफगाणिस्तानने फक्त १०.१ षटकामध्ये २ विकेट गमावून १०६ धावा केल्या.