पाकिस्तानचा खुर्दा, भारताचा U19 फायनलमध्ये 'यशस्वी' प्रवेश

भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये खुर्दा केला आहे. भारताने पाकिस्तानवर १० गडी आणि ८८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

india vs pakistan live score icc u19 world cup 2020 semi final ind pak south africa updates
पाकिस्तानचा खुर्दा, भारताचा U19 फायनलमध्ये 'यशस्वी' प्रवेश  |  फोटो सौजन्य: Twitter

पोर्टचेस्टरूम : भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये खुर्दा केला आहे. भारताने पाकिस्तानवर १० गडी आणि ८८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारत या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात 'यशस्वी' झाला आहे.  भारताच्या विजयात सुरूवातीला गोलंदाजांनी आणि नंतर सलामीवर फलंदाजांनी भारताचा विजय सुकर केला. 

भारताकडून मुंबईच्या यशस्वी जैस्वाल याने नाबाद १०५ धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.  अत्यंत महत्त्वाच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  परंतु भारतीय गोलंदाजी पुढे हा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. ठराविक अंतराळाने पाकिस्तानच्या विकेट घेत फलंदाजांना तंबूत धाडण्याचे काम भारतीय यंग ब्रिगेडने केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार रोहिलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याला सलामीवीर हैदरने चांगली साध देत ५६ धावा केल्या पण भारताच्या सुशांत याने सुरूवातीला धक्का देऊन आपल्या गोलंदाजी धार दाखवून दिली. सुशांत याने ८.१ षटकात २८ धावा देऊन शानदार ३ विकेट घेतल्या. त्याला तेज गोलंदाज त्यागी याने चांगली साथ दिली. त्यागीने ८ षटकात ३२ धावा देऊन २ विकेट पटकावल्या. तर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने १० षटकात ४६ धावा देऊन २ विकेट घेतल्या. यात हैदर आणि रोहिल यांची जोडी फोडण्याचे महत्त्वाचे काम सलामीवीर आणि पार्ट टाइम बॉलर यशस्वी जैस्वालने केली. त्याने आपल्या ३ षटकात ११ धावा देऊन १ महत्त्वाची विकेट घेतली. 

त्यानंतर पाकिस्तानच्या १७२ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि सक्सेना यांनी नाबाद खेळी करत १० गडी आणि ८८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.  यशस्वी जैस्वाल याने अंडर १९ वर्ल्ड कपमधील पहिले शतक झळकावले. यापूर्वीच्या सामन्यात त्याने तीन अर्धशतक झळकावली आहेत. ऑस्ट्रेलिया विरूद्धही त्याचे शतक हुकले होते. पण या सामन्यात पाकिस्तान विरूद्ध आणि सेमीफायनलमध्ये शतक झळकावून भारताच्या या जैस्वालने फायनलमध्ये यशस्वी धडक मारली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...