IND vs PAK: वर्ल्ड कप २०२२, भारत-पाकिस्तान यांच्यात सामना, पाहा कधी आहे मॅच

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 15, 2021 | 19:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप क्रिकेटचा सामना ६ मार्चला खेळवला जाणार आहे. स्पर्धेची सुरूवाती ४ मार्चला न्यूझीलंडमध्ये होईल. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात करणार आहे. 

india vs pakistan
भारत-पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकप २०२२मध्ये खेळणार पहिला सामना 
थोडं पण कामाचं
  • ८ संघ खिताब जिंकण्यासाठी मैदानावर उतरतील
  • आयसीसीनुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारताने आधीच क्वालिफाय केले आहे.
  • यजमान होण्याच्या नात्याने न्यूझीलंडने आपोआप क्वालिफाय केले आहे.

मुंबई: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात पुढील वर्षी ६ मार्चला आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२२चा(icc womens world cup) सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे स्पर्धेला सुरूवात करत आहे. स्पर्दा ४ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जाणार आहे. यानंतर हॅमिल्टनमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने असतील. ३१ दिवसांत एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत. india vs pakistan match in icc womens world cup 2022

८ संघ खिताब जिंकण्यासाठी मैदानावर उतरतील. आयसीसीनुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारताने आयसीसी विमेन्स चॅम्पियनशिप २०१७-२०२०मध्ये आपल्या स्थानाच्या आधारावर या स्पर्धेसाठी क्वालिफाय केले. तर यजमान होण्याच्या नात्याने न्यूझीलंडने आपोआप क्वालिफाय केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने आपल्या अभियानाची सुरूवात पाकिस्तानविरुद्ध केली. 

लीग फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार स्पर्धा

आयसीसी विमेन्स वर्ल्डकप २०२२ लीग फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. येथे ८ संघ एकमेकांशी सामना करणार आहे. लीगमध्ये टॉप ४मध्ये राहणाऱ्या संघादरम्यान सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनलचा सामना वेलिंग्टनमध्ये ३० मार्चला खेळवला जाणार आहे तर हेग्लेमध्ये ३१ मार्चला दुसरा सेमीफायनल खेळवला जाणार आहे. आयसीसी विमेन्स वर्ल्डकप २०२२चा खिताबी सामना ३ एप्रिलला रंगणार आहे. 

रकोरोना व्हायरसमुळे महिला क्रिकेट वर्ल्डकप क्वालिफायर रद्द झाल्यानंतर वनडे टीम रँकिंगच्या आधारावर बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाने वर्ल्डकपसाठी आपली जागा बुक केली. यासोबतच महिला क्रिकेटमध्ये ग्लोबल इव्हेंटचेही पुनरागमन होत आहे. गेल्या वेळेस मार्च २०२०मध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. येथे भारताला ऑस्ट्रेलियाने हरवून खिताब जिंकला होता. \

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी