IND vs PAK : 12 फेब्रुवारीला रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना; कुठे पाहता येणार Match

Women's T20 WC : आजपासून (10 फेब्रुवारी) या स्पर्धेला सुरूवात होत आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या  दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना हा 12 फेब्रुवारीला होणार आहे. या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तानशी भारतीय महिला संघाची लढत असणार आहे.

India vs Pakistan match Where to watch
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे पाहता येणार Match   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना हा 12 फेब्रुवारीला होणार आहे.
  • भारत आणि पाकिस्तानचे संघ ब गटात आहेत.
  • भारत-पाकिस्तान सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

IND vs PAK Womens Cricket : मुंबई :   भारत आणि पाकिस्तान( India and Pakistan) हे दोन्ही संघ आमनेसामने येणं  क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. दक्षिण आफ्रिकेत ( South Africa)वूमन्स टी 20 (Women's T20)वर्ल्ड कप (World Cup)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून (10 फेब्रुवारी) या स्पर्धेला सुरूवात होत आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या  दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना हा 12 फेब्रुवारीला होणार आहे. या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिद्वंदी पाकिस्तानशी भारतीय महिला संघाची लढत असणार आहे. (India vs Pakistan match to be played on February 12; Where to watch Match) 

अधिक वाचा  :हे ज्यूस तुमचा चेहरा बनवतील चमकदार

 भारत आणि पाकिस्तानचे संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. दरम्यान विश्वचषकातील हा सामना दोन्ही टीमसाठी जिंकणं हे प्रतिष्ठेचं आहे. मात्र या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रंगत, थरार असं सर्व काही पाहायला मिळणार आहे. कारण आतापर्यंत दोन्ही थरारक सामने झाले आहेत. 

अधिक वाचा  : या घरगुती उपायांमुळे Kidney Stone चं होईल पाणी

कुठे पाहणार सामना 

भारत-पाकिस्तान सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारत-पाकचा  रेकॉर्ड कसा आहे?

भारत आणि पाकिस्तान महिला संघात आतापर्यंत 13 टी-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व राखलं आहे. यावेळी भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ 3 सामने जिंकले आहेत. 

अधिक वाचा  : रुपाली भोसलेचं 'रेड हॉट' रुप पाहून चाहते घायाळ

 कसे आहेत दोन्ही संघ?

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. .

अधिक वाचा  :  दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...
पाकिस्तान संघ : बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शम्स, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन. 

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 12 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध विंडिज, 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी