India vs Pakistan: रोहित शर्माने पाकिस्तानच्या पत्रकारांना दिले असे उत्तर, तुम्हीही हसू रोखू शकणार नाही

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 17, 2019 | 13:30 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मॅन ऑफ दी मॅच रोहित शर्माल जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराना विचारले की पाकिस्तानच्या फलंदाजांना काही सल्ला द्यायचा आहे का? त्यावर हिटमॅनने मजेच्या अंदाजात उत्तर दिले जे ऐकून तेथे उपस्थित सारेच हसू लागले.

rohit sharma
रोहित शर्मा  |  फोटो सौजन्य: AP

मँचेस्टर: टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात रोहित शर्माने ११३ चेंडूत १६ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १४० धावा केल्या. यामुळे संघाला ५० ओव्हरमध्ये ५ बाद ३३६ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला पावसाच्या व्यत्ययामुळे ४० षटकांचा खेळ देण्यात आला होता. त्यांनी ६ बाद २१२ धावा केल्या.

सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅच ठरलेल्या रोहित शर्माला पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानी पत्रकाराने एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, पाकिस्तानच्या फलंदाजांना तुला काय सल्ला द्यायला आवडेल जेणेकरून त्यांची कामगिरी सुधारेल. यावेळी रोहित हसत म्हणाला, मी पाकिस्तानचा कोच झालो तर नक्कीच संघाला सल्ला देऊन. जर मी पाकिस्तानात कोच बनलो तेव्हाच सांगेन. आता काय सांगू.असे रोहितने उत्तर दिले. रोहितचे हे उत्तर ऐकून प्रेस कॉन्फरन्समधील लोक जोरजोरात हसू लागले. 

बघा हा मजेशीर व्हिडिओ

 

 

रोहितने सध्याच्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. याबाबत त्याला विचारले असता रोहितने याचे श्रेय आपल्या मुलीला दिले आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणाला, मी सध्या चांगल्या स्पेसमध्ये आहे. माझ्या आयुष्यात मुलगी आली आहे ज्यामुळे मी खूप खुश आहे. मी आयपीएलपासून क्रिकेटचा आनंद घेत आहे. येथे आम्ही चांगली सुरूवात करण्यावर लक्ष दिले आणि मला वाटते एक संघ म्हणून आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत. 

दरम्यान, यावेळी त्याला विचारले की पाकिस्तानविरुद्धचे शतक त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे का यावर रोहितने नकार दिला. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता तेव्हा संघासाठी तुमच्या सगळ्याच खेळी महत्त्वाच्या असतात. तो म्हणाला, मला विश्वास आहे की जेव्हा मी पुढचे शतक ठोकेन तेव्हा पुन्हा तुम्ही मला हा सवाल करणार. कोणत्याही खेळीला उच्च स्थानी ठेवणे कठीण आहे कारण  देशासाठी खेळल्या गेलेल्या प्रत्येक खेळीला महत्त्व आहे. यासाठी याची निवड करणे कठीण आहे. 

टीम इंडियाचा आता पुढील सामना २२ जूनला साऊथम्पन येथे अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
India vs Pakistan: रोहित शर्माने पाकिस्तानच्या पत्रकारांना दिले असे उत्तर, तुम्हीही हसू रोखू शकणार नाही Description: मॅन ऑफ दी मॅच रोहित शर्माल जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराना विचारले की पाकिस्तानच्या फलंदाजांना काही सल्ला द्यायचा आहे का? त्यावर हिटमॅनने मजेच्या अंदाजात उत्तर दिले जे ऐकून तेथे उपस्थित सारेच हसू लागले.
Loading...
Loading...
Loading...