IND vs PAK: सानिया मिर्झा आणि मलिक यांच्यात सोशल मीडियावर झाली टक्कर

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 18, 2019 | 16:17 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

IND vs PAK: पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकची पत्नी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने अभिनेत्री वीणा मलिकला भारत-पाकिस्तान सामन्यानंतर खरे-खोटे ऐकवले.

sania mirza and veena malik
सानिया मिर्झा आणि वीणा मलिक 

मँचेस्टर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सदस्य शीशा बारमध्ये जंक फूडचा आनंद घेत असल्याचे दिसत आहेत. फॅन्सचा दावा आहे की हा व्हिडिओ १५ जूनचा आहे आणि दुसऱ्याच दिवशी भारत-पाकिस्तान हायवोल्टेज सामना रंगणार होता. याच कारणामुळे पाकिस्तानला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलेय की हा व्हिडिओ १३ जूनचा आहे मात्र हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच तापले आहे. या दरम्यान सानिया मिर्झा आणि अभिनेत्री वीणा मलिक यांच्यातही चांगलाच वाद रंगला. वीणाने व्हिडिओला हायलाईट करताना सानियाच्या मुलाबाबत आपली चिंता व्यक्त केली. वीणाच्या मते सानिया मिर्झा आपला मुलगा इजहानला शीशा बारमध्ये घेऊन गेली होती. त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाला काय खाल्ले पाहिजे यावरही आपले ज्ञान दिले. वीणाने हा सल्लाही दिला की टेनिस स्टारला पाकिस्तानी खेळाडूंना जंक फूड खाण्यापासून रोखायला हवे होते. कारण खुद्द तिला चांगल्या आहाराचे महत्त्व माहित आहे. 

वीणाने ट्वीट केले की, सानिया मला खरं बाळाची चिंता वाटतेय. तुम्ही त्याला शीशा बार येथे घेऊन गेलात. हे भयानक नाही का? यासोबतच  मला जेवढी माहिती आहे आर्ची पूर्णपणे जंक फूड आहे जे खेळाडू तसेच मुलांसाठी योग्य नव्हे. तुम्हाला हे चांगलेच माहिती असेल कारण तुम्ही एक आई आहात आणि खेळाडूही. 

यावर सानियाने वीणाला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली, मी माझ्या बाळाला शीशा बारमध्ये घेऊन गेले होते. ना मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची डाएटिशियन आहे. त्यामुळे त्यांनी काय खावे, खाऊ नये हा सल्ला देऊ शकत नाही. तसेच मी माझ्या मुलाला शीशा बारमध्ये घेऊन गेले नव्हते त्यामुळे जगाला याबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण मला वाटते इतरांच्या तुलनेत मी माझ्या मुलाची चांगली काळजी घेऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची डाएटिशियन नाही तसेच त्यांची आई, प्रिन्सपल अथवा टीचरही नाही. 

यानंतर सानियाने आणखी एक ट्वीट केले, त्यांना माहित आहे की कधी झोपायचे, कधी उठायचे आणि कधी खायचे. मात्र तुम्हाला असलेल्या काळजीबद्दल धन्यवाद. सानिया यावरच थांबली नाही. तिने साधे ट्वीट करत सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्यांना चांगलेच बोल लगावले आणि सल्ला दिला की ट्रोलर्सना त्यांची निराशा व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या माध्यमाची मदत घेतली पाहिजे. 

तिने पुढे ट्वीट केले की, ट्विटरने माझे डोके फिरवे आहे आणि काही लोकांनाही असेच वाटत असेल. तुमच्यासारख्या लोकांना निराशा व्यक्त करण्यासाठी अन्य माध्यमांची गरज आहे. शांती ठेवा यार. ब्रेक टाईम

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणेही मुश्किल झाले आहे. आता सध्या ते पॉईंटटेबलमध्ये नवव्या स्थानावर आहेत. पाकिस्तानी संघाला जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना उरलेले सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...