India vs Pakistan Women's T20 WC: आज भारत-पाकिस्तानचा सामना, हरमनसमोर देशाला जिंकवण्याचे आव्हान 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Feb 12, 2023 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Pakistan Women's T20 WC : आयसीसी महिला टी20 विश्व कप 2023 मध्ये भारतीय टीम आपल्या खेळाची सुरूवात पाकिस्तान विरूध्द करणार आहे. पाकिस्तानशी असलेला हा सामना आज 12 फेब्रुवारीला केपटाउनच्या न्यूलॅंडच्या मैदानावर होणार आहे.

India-Pakistan match to be held in World Cup
India vs Pakistan Women's T20 WC: आज भारत-पाकिस्तानचा सामना  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • टीमच्या कॅप्टनची धुरा हरमनप्रीत कौरच्या हाती आहे
  • पाकिस्तानने भारताला गेल्या वर्षी एशिया कपमध्ये हरवलं होतं
  • भारत सगळ्यांवर वरचढ

India vs Pakistan Women's T20 WC : आयसीसी महिला टी20 विश्व कप 2023 मध्ये भारतीय टीम आपल्या खेळाची सुरूवात पाकिस्तान विरूध्द करणार आहे. पाकिस्तानशी असलेला हा सामना आज 12 फेब्रुवारीला केपटाउनच्या न्यूलॅंडच्या मैदानावर होणार आहे. टीमच्या कॅप्टनची धुरा हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर  बिस्माह मारूफ पाकिस्तान टीमचे नेतृत्त्व करणार आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजेपासून सुरू होईल.

भारत-पाकिस्तानचा सामना हा नेहमीचं रोमांचक राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत दोन्ही संघांच्या कामगिरीत कमालीचा फरक आहे. तरी पाकिस्तानने भारताला गेल्या वर्षी एशिया कपमध्ये हरवलं होतं.  त्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे अतिप्रयोग करणं.  भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वर्चस्वाला सातत्याने आव्हान देत आहे, तर पाकिस्तानी महिला संघ त्यांना संघांना हवी तशी टक्कर देऊ शकलेला नाही. 

दुखापतीमुळे स्मृती मानधना बाहेर

पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात टीम इंडियाला पहिलाच मोठा झटका बसला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यात खेळणार नाहीये. तर इतर उर्वरित सामन्यांसाठीही ती अपात्र ठरली  आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी हरमनप्रीतवर येऊन पडली आहे. तसेच अंडर-19 विश्व कप जिंकणारी शेफाली वर्मा पाकिस्तानविरूध्द दमदार खेळ करण्यास उत्सुक आहे.  त्याचबरोबर जेमिमा रॉड्रिग्जकडूनही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

गोलंदाजांसमोर चांगले खेळण्याचे आव्हान

दिप्ती शर्मावर पण सामन्यात चांगले खेळ्याची जबाबदारी आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रेणुका सिंगशिवाय गोलंदाजांकडून चांगला खेळ होईल असा विश्वास नाही. 

हरफनमौला पूजा वस्त्राकरची भूमिकासुध्दा भारतासाठी फार महत्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, निदा दार आणि कर्णधार बिस्माह मारूफ हे पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. पाकिस्तानने नुकतीच ऑस्ट्रेलियात मालिका खेळली आणि सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. पण दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. तर भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय सराव सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्कारावा लागला, मात्र त्याने बांगलादेशचा पराभव केला.  

भारत सगळ्यांवर वरचढ

भारतीय महिला संघ या विश्व कपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे. पण ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या टीमला हरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. बघायचं झालं तर भारत आणि पाकिस्तानच्या महिला टीममध्ये आतापर्यंत 13 टी20 सामने झाले आहेत. यात भारताने 10 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 3 जिंकले आहेत.

भारतीय टीम-11

यास्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर(कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह, राधा यादव, शिखा पांडे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी