IND vs SA 1st T20I:भारत-द. आफ्रिका सामन्यात कशी असेल पिच आणि हवामान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 09, 2022 | 12:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA 1st T20I pitch report: दक्षिण आफ्रिका आणि यजमान टीम इंडिया यांच्यात संध्याकाळी खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यांची पिच कशी असणार आहे तसेच हवामान कसे असणार आहे जाणून घेऊया...

stadium
IND vs SA :भारत-द. आफ्रिका सामन्यात कशी असेल पिच आणि हवामान 
थोडं पण कामाचं
  • भारत-द. आफ्रिका मालिकेतील पहिला सामना
  • आज दिल्लीत रंगणार पहिला टी-२० सामना
  • पिच आणि खेळाडूंसोबत हवामान असणार मोठे आव्हान

मुंबई: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यातील टी-२० मालिकेला(t-20 series) सुरूवात आहेत आहे. दिल्लीत आज पहिला टी-२० सामना रंगणार आहे. या टी-२० मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. तसेच यावर्षी टी-२० वर्ल्डकप पाहता सर्व देशांचे संघ या प्रकाराच आपली चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतीरी. त्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. india vs souh africa first t-20 match pitch report and weather

अधिक वाचा - दीड वर्षाच्या मुलाला जवानांनी वाचवलं, पहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघाला ही मालिका सुरू होण्याच्या एकच दिवस आधी म्हणजेच बुधवारी जोरदार झटका बसला. कर्णधार केएल राहुल आणि स्पिनर कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाल्याने मालिकेच्या बाहेर गेले आहेत. त्याच्या जागी आता ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे आणि हार्दिक पांड्या पहिल्यांदा टीम इंडियाचे उप कर्णधारपद भूषवत आहेत. पहिला टी-२० सामना दिल्लीच्या प्रचंडा गरमीमद्ये अरूण जेटली स्टेडियममध्ये रंगणार आहे. जाणून घ्या कशी असणार दिल्लीची पिच आणि हवामान...

दिल्लीचा पिच रिपोर्ट

दिल्लीस्थित अरूण जेटली स्टेडियममध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवला जात आहे. या मैदानावर तब्बल तीन वर्षांनी सामना रंगत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये जास्त उत्सुकता असेल. चिंतेची बाब म्हणजे या मैदानावर जेव्हा शेवटच्या वेळेस नोव्हेंबर २०१९मध्ये टी-२० सामना खेळवण्यात आला होता. तेव्हा बांगलादेशच्या संघाने भारताला ७ विकेटनी हरवले होते. त्यामुळे भारतीय संघाा हा इतिहास विसरून चालणार नाही. 

या पिचवर लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवण्यासाठी जे सर्वात मोठे आव्हान मिळवले ते म्हणजे १५९ धावा. पिचवर फलंदाजांना मदत मिळेल मात्र जसजसे संध्याकाळ वाढल तसे वेगवान गोलंदाजांना काही मदत मात्र फिल्डर्ससाठी कठीण असेल. या पिचवर सर्वाधिक स्कोर २०२ धावा आणि सर्वात कमी स्कोर १२० धावा आहे. 

अधिक वाचा - महिला खेळाडूंच्या भूमिकेत दिसणार या अभिनेत्री

आज कसे असेल हवामान

आज दोन्ही संघांना विरोधी संघाच्या आव्हानासोबतच आणखी एक आव्हान असे ते म्हणजे दिल्लीचे हवामान. या वेळेस दिल्लीत मोठ्या प्रमाणात गरमी आहे. सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल मात्र दिवसभराच्या गरमीचा संध्याकाळी त्रास होऊ शकतो. गुरूवारी दिल्लीचे सर्वाधिक तापमान ४३ डिग्री सेल्सियस असेल तर कमीत कमी तापमान ३१ असू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी